घरमहाराष्ट्रपालिकेच्या हौदात श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे विसर्जन

पालिकेच्या हौदात श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे विसर्जन

Subscribe

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे विसर्जन कृत्रिम तलावात

दहा दिवस गणपती बाप्पाची भक्ती केल्यानंतर गुरूवारी मुंबईसह राज्यभरात बाप्पाच्या विसर्जनाला सुरू झाली होती. मुंबईतील लालबागचा राजा गिरगांव चौपाटीला विसर्जनाकरिता दाखल झाला असून थोड्याच वेळात लालबागच्या राजाचे विसर्जन होणार आहे. तर पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा विसर्जन सोहळा दुपारनंतर सुरू झाला होता. तब्बल १४ ते १५ तासांनंतर सुरू असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे विसर्जन कृत्रिम तलावात होणार असून पालिकेच्या हौदात श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे विसर्जन झाले.


तब्बल २२ तासांनंतर लालबागच्या राजाचे विसर्जन

विसर्जनाला भाविकांची अलोट गर्दी

पुण्यातील दगडूशेठ गणपती बाप्पा लाखो भाविकाचं श्रद्धास्थान मानले जाते. फक्त गणेशोत्सवच नाही तर इतर वेळीही पुण्यातल्या दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी असते. दगडूशेठ हलवाई गणपती हे पुण्याची ओळख आहे असेही म्हटले जाते. गणेशोत्सवातही गणपतीच्या दर्शनाला भाविकांची गर्दी होतेच. यंदा ही श्रीमंत दगडूशेठ हलवाईच्या गणपती बाप्पाच्या विसर्जनाला भाविकांची अलोट गर्दी बघायला मिळाली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -