घरमहाराष्ट्रहुतात्मा चौक ते मरीन लाइन्सचा होणार कायापालट; श्रीकांत शिंदेंची मनपाकडे मागणी

हुतात्मा चौक ते मरीन लाइन्सचा होणार कायापालट; श्रीकांत शिंदेंची मनपाकडे मागणी

Subscribe

मुंबई : मुंबई महापालिका (Brihanmumbai Municipal Corporation) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे चिरंजीव व खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांनी, हुतात्मा चौक (Hutatma Chowk) ते मरीन लाइन्स (Marine Lines) परिसराचा कायापालट करण्याचा संकल्प सोडला आहे. हुतात्मा चौक, मरीन लाइन्स परिसरात सायकल ट्रॅक व पर्यटकांना क्षणभर विश्रांती देण्यासाठी आसन व्यवस्था निर्माण करण्याची मागणी खासदार श्रीकांत शिंदे यांनी मुंबई महापालिका (BMC) आयुक्त डॉ. इकबाल चहल यांच्याकडे केली आहे. त्यांच्या मागणीला पालिका प्रशासनाने सकारात्मकता दर्शवली असून लवकरच त्याबाबत अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. मुंबईत गेट वे ऑफ इंडिया, आर्ट गॅलरी, राणी बाग, चौपट्या आदी पर्यटन स्थळे असल्याने या ठिकाणी दररोज अनेक देशी – विदेशी पर्यटक हे भेटी देतात. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी शासन व मुंबई महापालिका आपल्या परीने विविध सेवासुविधा बहाल करीत असते. याच अनुषंगाने, खासदार श्रीकांत शिंदे यांनी फोर्ट विभाग आणि मरीन ड्राइव्ह येथील परिसराचा कायापालट करण्याचा संकल्प सोडला आहे. त्यांनी, दोन दिवसांपूर्वी पालिका आयुक्त इकबाल चहल यांची भेट घेतली होती. यावेळी, अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजनांद्वारे फोर्ट आणि मरीन ड्राइव्हच्या प्रस्तावित आराखड्याबाबत सादरीकरण करण्यात आले.

- Advertisement -

मरीन ड्राईव्ह परिसरात सायकल ट्रॅक, मुंबईतील नागरिकांसाठी शौचालयांची उपलब्धता, बसण्यासाठी आसन आणि माहितीपूर्ण चिन्हांचा फलक लावावेत, अशा सूचना शिंदे यांनी यावेळी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना केल्या. तसेच, फोर्ट विभागाच्या पुनर्निर्मितीसाठी पार्किंग, फेरीवाला झोन, पुरातन वास्तू आणि ऐतिहासिक मॅपिंग या मुद्द्यांवरही यावेळी चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे, स्ट्रीट मॅपिंगच्या योजना तसेच रुंद फूटपाथ आणि पार्किंगच्या नियोजनावरही चर्चा करण्यात आल्याचे श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

सुशोभीकरणाच्या कामांनाही वेग
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने मुंबई महापालिकेने हाती घेतलेल्या 1,729 कोटी रुपयांच्या एकूण 1,077 कामांपैकी 50 टक्के कामे पूर्ण झाली आहेत, असा दावा महापालिका प्रशासनाने अलीकडेच केला होता. पहिल्या टप्प्यात 500 तर दुसऱ्या टप्प्यात 320 व इतरही अतिरिक्त अशी एकूण 1 हजार 77 कामे हाती घेतली होती. यापैकी 613 कामे पूर्ण झाली आहेत; म्हणजे 50 टक्के कामे ठरल्याप्रमाणे मार्चअखेर पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामे प्रगतिपथावर असून पावसाळा सुरू होण्याआधी पूर्ण करावीत, अशी सूचना आयुक्तांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -