घरमहाराष्ट्रनितेश राणेंना दुसरा झटका; १६ कोटींचं थकीत कर्ज, सहकार विभागाकडून कारवाईचा बडगा

नितेश राणेंना दुसरा झटका; १६ कोटींचं थकीत कर्ज, सहकार विभागाकडून कारवाईचा बडगा

Subscribe

भाजप आमदार नितेश राणेंच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाही आहेत. संतोष परब हल्ला प्रकरणी अटकेची टांगती तलवार असताना दुसरा धक्का बसला आहे. थकीत कर्जामुळे नितेश राणेंविरोधात सहकार विभागाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीसाठी आज मतदान होत असून नितेश राणे यांचा मतदानाचा हक्क थकीत कर्जामुळे नाकारण्यात आला आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात बऱ्याच राजकीय घडामोडी घडत असताना मतदानाच्या पूर्वसंध्येलाच भाजप प्रणित पॅनलला मोठा धक्का सहकार विभागाने दिला. या निवडणुकीसाठी आमदार नितेश राणे यांना मतदानाचा हक्क नाकारण्यात आला आहे. राणेंच्या सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाने जिल्हा बँकेकडून १६ कोटी रुपये कर्ज घेतले होते. हे कर्ज थकीत असल्यामुळे सहकार विभागाने नितेश राणे यांचा मतदानाचा हक्क नाकारला आहे.

- Advertisement -

नितेश राणे हे सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य आहेत. सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाने घेतलेलं १६ कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड अद्याप केलेली नाही. त्यामुळे सहकार विभागाने नितेश राणेंचा मतदानाचा अधिकार नाकारला आहे. भाजपकडून जिल्हा बँकेसाठी उमेदवार म्हणून नितेश राणेंचे नाव चर्चेत होते. मात्र त्यांचा मतदानाचा हक्क नाकारला गेल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणेंना आणि भाजपाला मोठा धक्का बसला आहे.

अटक की बेल आज ठरणार

शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्जाची याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील बुधवारी सुनावणी करण्यात आली. सरकारी वकील आणि नितेश राणे यांच्या वकिलांमध्ये न्यायालयात जोरदार युक्तिवाद झाला आहे. अखेर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला असून गुरुवारी पुन्हा सुनावणी होणार असल्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. न्यायालयात सरकारी वकिलांनी जोरदार युक्तिवाद करत आरोपींबाबतचे फोटो आणि माहिती न्यायालयाला दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – नितेशच्या अटकेसाठी राणेंच्या घरावर नोटीस


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -