घरठाणे...तर अजितदादांनीही माफी मागावी - मुख्यमंत्री

…तर अजितदादांनीही माफी मागावी – मुख्यमंत्री

Subscribe

ठाणे । महापुरुषांचा आणि संतांचा अपमान झाला आहे. याबद्दल माफी मागितली पाहिजे अशी भूमिका विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात घेतली होती. त्यातच अजितदादांनी केलेल्या वक्तव्याने छत्रपती संभाजी महाराजांचा आणि त्यांनी दिलेल्या बलिदानाचाही अपमान झाला आहे. त्यामुळे अजितदादांनी माफी मागितली पाहीजेल अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी रात्री ठाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. तसेच सर्वांना सारखा न्याय असला पाहिजे असेही मुख्यमंत्री म्हटले.

छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल अजितदादांनी केलेल्या वक्तव्यानंतर भाजपा चांगली आक्रमक झाली आहे. अजितदादांविरोधात आंदोलन केले जात आहे. भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये वाद चांगलाच रंगला आहे. याचदरम्यान प्रसारमाध्यमांनी मुख्यमंत्री शिंदे हे सोमवारी रात्री ठाण्यात आल्यावर या वक्तव्याबाबत त्यांना छेडले असता, मुख्यमंत्र्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना वरील विधान केले आहे. पुढे बोलताना, धर्मवीर संभाजी महाराज यांच्याबद्दल ते धर्मवीर नाहीत असे वक्तव्य अजितदादांनी केले. त्यांच्याकडूनही अपेक्षा नव्हती. औरंगजेबने छत्रपती संभाजी महाराजांना धर्म सोडा यासाठी हाल केले. त्या झालेल्या हालाबद्दल शब्दांमध्ये वर्णन होऊ शकत नाही,असेही ते म्हणाले.

- Advertisement -

संभाजी महाराजांना धर्मवीर ही पदवी तुम्ही,आम्ही दिलेली नाही. त्यांनी धर्मासाठी आणि स्वराज्यासाठी बलिदान दिले म्हणून त्यांना धर्मवीर ही पदवी लागली आहे. असे म्हणत, इतिहास कसा पुसू शकता असाही सवालही बोलताना मुख्यमंत्र्यांनी अजितदादांना केला आहे. अधिवेशनात आपण घेतलेल्या भूमिकेप्रमाणे संभाजी महाराज आणि त्यांच्या बलिदानाबद्दल माफी माघावी, न्याय सर्वांना सारखा असला पाहिजे. असेही मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -