घरताज्या घडामोडीसोलापुरात १६ पोलिसांना कोरोनाची बाधा, आकडा २५० वर

सोलापुरात १६ पोलिसांना कोरोनाची बाधा, आकडा २५० वर

Subscribe

सोलापुरात १६ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली असून कोरोनाबाधितांचा आकडा २५० वर गेला आहे.

कोरोना विषाणूने राज्यात आपला विळखा अधिक घट्ट केला आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. या कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी पोलीस प्रशासन अहोरात्र मेहनत घेत आहेत. या सगळ्या धावपळीच्या जीवनात मात्र, पोलिसांना देखील आता कोरोनाची बाधा होत आहे. आतापर्यंत सोलापूरमधील शहर आणि ग्रामीण पोलीस दलातील १६ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

काही दिवसांपूर्वी सोलापूरच्या ग्रामीण पोलीस दलातील दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर या पोलिसांच्या संपर्कात येणाऱ्या इतर पोलिसांची तपासणी केली असता, त्यांचे देखील रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. यानंतर या दोघांच्या संपर्कात येणाऱ्या पोलिसांची तपासणी केली असता, तब्बल ९ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आतापर्यंत सोलापूरच्या ग्रामीण पोलीस दलातील १३ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर शहर पोलीस आयुक्तालयाच्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे एकूण १६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिली आहे.

- Advertisement -

सोलापूरात २५० जणांना लागण

सोलापूरमध्ये कोरोनाबाधितांची संख्या आता २५० वर गेली आहे. त्यामुळे सोलापूरमधील नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे. तर यातील ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४१ जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

अहोरात्र करणाऱ्या पोलिसांना लागण

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस प्रशासन दिवसरात्र पहारा देत आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्र, नाकाबंदी, विनाकारण रस्त्यावर भटकणारे नागरिक अशा सगळ्यांसाठी १२ मार्चपासून पोलीस अहोरात्र मेहनत घेत आहेत. त्याचप्रमाणे नागरिकांना घराबाहेर पडू नका, अशी विनंती देखील करत आहेत. मात्र, आता या पोलिसांनाच कोरोनाने विळखा घातल्याने चिंतेचे वातावरण पसरु लागले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – पायी चालत निघालेल्या मजुरांच्या मदतीसाठी धावले ठाणे पोलीस


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -