घरताज्या घडामोडीकाश्मीरमध्ये लष्कराला हाय अलर्ट! जैश-ए-मोहम्मद कारवाईच्या तयारीत?

काश्मीरमध्ये लष्कराला हाय अलर्ट! जैश-ए-मोहम्मद कारवाईच्या तयारीत?

Subscribe

एकीकडे देशात कोरोनाचा कहर सुरू असताना सीमेवर दहशतवादी कारवाया आणि सीमेपलीकडून पाकिस्तानकडून केल्या जाणाऱ्या कारवाया वाढल्या आहेत. जैश-ए-मोहम्मदचा काश्मीरमधील कमांडर रियाज नायकूचा खात्मा भारतीय लष्कराने केल्यानंतर काश्मीरमधील जैशच्या हालचाली वाढल्याची माहिती आहे. न्यूज १८ने हिंदुस्तान टाईम्सच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार लवकरच जैश गाजी हैदर नावाच्या एका व्यक्तीला कमांडर म्हणून नियुक्त करण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जैशकडून काही कारवाया काश्मीरमध्ये होण्याची शक्यता असून लष्कराला हाय अलर्ट देण्यात आल्याची देखील माहिती आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी रियाज नायकूला कंठस्नान घातलं.

११ मे रोजी जैशकडून काही घातपाती कारवाया होण्याची शक्यता असल्याची माहिती मिळाली असून त्यानुसार भारतीय लष्कराने देखील हाय अलर्ट जारी केला आहे.

- Advertisement -

जैश ए मोहम्मदकडून काश्मीरमध्ये कारवाई करण्यासाठी स्थानिक काश्मीरी नागरिकांचा वापर केला जात असल्याचं याआधीच्या काही घटनांमधून दिसून आलं होतं. गेल्या वर्षी झालेल्या पुलवामा हल्ल्यामध्ये देखील हीच मोडस ऑपरांडी वापरण्यात आली होती. या हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे ४० हून जास्त जवान शहीद झाले होते. स्थानिकांना हाताशी धरून हल्ले केल्यामुळे पाकिस्तान नामानिराळा राहून काश्मिरींनीच हल्ला केल्याचा दावा करू शकतो, म्हणून स्थानिकांना हल्ल्यात सहभागी करून घेतलं जात असल्याचंही सांगितलं जातं.


वाचा सविस्तर – भारतीय लष्कराची मोठी कारवाई; हिज्बुलच्या कमांडरला कंठस्नान!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -