घरमहाराष्ट्रParab vs Somaiya : अनिल परबांविरोधातील सोमय्यांचा आरोप पुन्हा फसला?

Parab vs Somaiya : अनिल परबांविरोधातील सोमय्यांचा आरोप पुन्हा फसला?

Subscribe

मुंबई : दापोलीच्या साई रिसॉर्टप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ED) दाखल केलेल्या आरोपपत्रात आरोपी म्हणून ठाकरे गटाचे प्रमुख नेते आणि माजी मंत्री अनिल परब (Anil Parab) यांचे नाव नसल्याचे समोर आले आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी हे प्रकरण लावून धरले होते. त्यामुळे किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी अनिल परब यांच्याविरोधात केलेला हा दुसरा आरोप फसला असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

भाजपा नेते किरीट सोमय्या हे सातत्याने महाविकास आघाडीतील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक आणि हसन मुश्रीफ तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे व त्यांचे कुटुंबीय, खासदार संजय राऊत आणि अनिल परब यांच्यावर किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.

- Advertisement -

त्यातही किरीट सोमय्या यांनी दापोली येथील साई रिसॉर्ट प्रकरणी रान उठवले होते. किरीट सोमय्या यांनी हा घोटाळा समोर आणताना यात अनिल परब यांचा सहभाग असल्याचा दावाही केला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे रिसॉर्ट बांधल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 2017मध्ये अनिल परब यांनी या रिसॉर्टसाठी भूखंड विकत घेतला आणि कोरोनादरम्यान लॉकडाऊनच्या काळात या शेतीच्या भूखंडावर रिसॉर्ट बांधण्याचे काम केले, असा दावाही त्यांनी केला. याप्रकरणी ईडीने ठिकठिकाणी छापेमारी करत अनिल परब यांची चौकशीही केली होती.

तथापि, ईडीने साई रिसॉर्ट प्रकरणी पीएमएलए न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. त्यात विविध अधिकाऱ्यांसह किमान सहा आरोपींची नावे नोंदवली आहेत. तथापि, त्या आरोपींमध्ये अनिल परब यांचे नाव नाही. केवळ त्यांचा उल्लेख आहे. याबाबत ईडी पुरवणी आरोपपत्र दाखल करून त्यात अनिल परब यांचे नाव देऊ शकते, असा तर्क व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, मूळ आरोपपत्रात त्यांचे नाव नसल्याने तशी शक्यता कमी आहे, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

एकूणच याप्रकरणामुळे अवघ्या पाच महिन्यांत किरीट सोमय्या यांचा अनिल परब यांच्याविरोधातील दुसरा आरोप फसला असल्याची चर्चा सुरू झाली आहे. याआधी अनिल परब यांचे वांद्रे येथील कार्यालय अनधिकृत असल्याची तक्रार सोमय्या यांनी लोकायुक्तांसमोर केली होती. सोमय्या यांनी म्हाडाला पत्र लिहून हे बांधकाम पाडण्याची मागणी केली. त्यानंतर अनिल परब यांचे वांद्रे येथील म्हाडा कॉलनमधील अनधिकृत कार्यालय तोडण्यात आले असल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी ट्विटरवरून दिली होती.

मात्र, कार्यालयाची जागा सोसायटीने अनिल परब यांना वापरायला दिली होती. म्हाडाने अनिल परब यांना नोटीस बजावली होती. पण ही जागा आपली नसल्याचे स्पष्टीकरण परब यांनी दिल्यावर म्हाडाने नोटीस मागे घेतली. यानंतर म्हाडा वसाहतीमधील रहिवाशांनी कार्यालयाचे बांधकाम नियमित करण्यासाठी अर्ज केला. म्हाडाने त्याला नकार दिला होता, असे परब यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे सोमय्या यांच्या आरोपात कितपत तथ्य आहे, असा प्रश्न विचारला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -