घरमहाराष्ट्रआपल्याकडे ३६५ दिवस लोक शिमगा करतात, फडणवीसांची विरोधकांवर टोलेबाजी

आपल्याकडे ३६५ दिवस लोक शिमगा करतात, फडणवीसांची विरोधकांवर टोलेबाजी

Subscribe

मुंबई – महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात उत्साहात धुळवड साजरी करण्यात आली. यावेळी राजकीय धुळवडही अनेक ठिकाणी पाहायला मिळाली. विविध कार्यक्रमात उपस्थित राहिलेल्या राजकीय नेते मंडळींनी एकमेकांवर आगपाखड केली. त्यातच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विरोधकांवर निशाणा साधला. आपल्याकडे काही लोक ३६५ दिवस शिमगा करत असतात, असं फडणवीस म्हणाले. फडणवीसांनी काल उत्तर भारतीयांसोबत धुळवड साजरी केली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मला फक्त एक-दोन लोकांना सल्ला द्यायचा आहे. उत्तर भारतात होळीच्या दिवशी शिमगा साजरा करण्याची पद्धत आहे. आपल्याकडेही शिमगा साजरा केला जातो. पण आपल्याकडे काही लोक ३६५ दिवस शिमगा करतात. त्यांना मला एवढंच सांगायचंय की, एखाद्या दिवशी शिमगा ठीक आहे. पण उरलेले ३६४ दिवस सभ्य माणसासारखं वागण्याचा प्रयत्न केला, तर उत्तम होईल.”

- Advertisement -

हेही वाचा – अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजपासून दुसरा आठवडा, आधुनिक महिला धोरण ठराव मांडणार

विरोधकांना फैलावर घेताना फडणवीस म्हणाले की, “आमचे काही मित्र आहेत. त्यांना मागच्या काळात कुणीतरी खोटं सांगून भांग पाजली होती. त्यानंतर काही दिवस त्यांचं जे काही चालंल होतं, ते पाहून मजा आली. कुणी गाणं म्हणत होतं, कुणी रडत होतं. पण मी हे सांगण्याचा प्रयत्न केला की, अशी नशा करण्यापेक्षा भक्तीचा, संगीताचा किंवा कामाचा नशा करावा.”

- Advertisement -

“आम्ही विधानसभेत उभं राहून म्हटलं होतं की, खूप लोकांनी आम्हाला त्रास दिला आहे. त्या सर्व लोकांचा आम्ही बदला घेऊ. आम्ही त्या सर्व लोकांना माफ केलं आहे, हाच आमचा बदला आहे. आम्ही आधीच माफ केलं आहे. आमच्या मनात काहीही कटुता नाही,” असंही यावेळी फडणवीस म्हणाले.

हेही वाचा – यंदाही प्रशासकीय अर्थसंकल्प

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -