विशेष : ‘यांच्यामुळे’ कुंटणखान्यातील नवी पिढी आली मुख्य प्रवाहात; वारांगनांचे जीवन झाले प्रकरशमय

अजिंक्य बोडके । नाशिक

नाशिक : वारंगना अर्थात वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांचे जीवन हे अंधारमय असतं. त्यांचं व त्यांच्या मुलांचं कुठलं भविष्यच नाही. वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या त्या महिला व त्यांचे मूल या दलदलीतच फसून राहतात. पुढे जाऊन त्यांची मुलं सुद्धा याच व्यवसायात अडकून पडतात व व्यसनाधीनता तसेच वाममार्गाला जातात. पुढे या सर्व दृष्टचक्रात फसत जातात. हा सगळा दृष्टचक्र ओळखत आसावरी देशपांडे यांच्या प्रवारा या संस्थेने 17 वर्षांपूर्वी या वारांगणाच्या आयुष्यात उजेड आणण्यास सुरुवात केली. त्याच फलस्वरूप म्हणून आज या वारंगणाची पुढची पिढी ही मोठ्या संख्येने या व्यवसायातून बाहेर तर पडलीच शिवाय आपल्या कुटुंबातील महिला व इतर महिलांनाही यातून बाहेर काढण्यात तसेच स्वतच्याही जीवनात यशशिखरावर पोहचण्यात यशस्वी ठरली आहे.

प्रवरा मेडिकल ट्रस्ट या संस्थेने 17 वर्षांपूर्वी वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या आरोग्याबाबत एक कार्यक्रम हाती घेतला. त्या माध्यमातून त्यांनी एड्स बाबत जनजागृती, सुरक्षित संभोग, त्यासोबत व्यसनाधता, आजार याबाबत या महिलांची जागृती केली. सुरुवातीला थोडा त्रास झाला मात्र काही दिवसानंतर या महिलांनीही त्यांना चांगला प्रतिसाद दिला. आज त्याचं यश म्हणून मागील तीन वर्षांमध्ये कुठल्याही वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलेला एड्सची लागण झालेली नाही. आज नाशिक जिल्ह्यातील किमान 2 हजार वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला या प्रवरा संस्थेची संलग्न आहेत. या सर्व महिलांची दर सहा महिन्याला पूर्ण आरोग्य तपासणी केली जाते त्यांच्या आरोग्याकडे लक्ष दिल जात. त्या सुदृढ कशा राहतील याची काळजी घेतली जाते. जर त्यांना कुठल्या आजाराची लागण झाली असेल तर त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी सुद्धा प्रवरा मेडिकल ट्रस्ट काम करते.

एड्सग्रस्त आणले शून्यावर –

आसावरी देशपांडे यांच्या संकल्पनेतून वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांचे मोठ्या स्तरावर आरोग्य, सुरक्षित संभोग यांसोबत एड्स व गुप्तरोग यांसारख्या आजाराबाबत जागृती केली. यातून मागील दशकभरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलामध्ये मोठ्या प्रमाणात निरोधचा वापर व आरोग्याची काळजी घ्यायला सुरवात केली. त्याचाच यश म्हणून मागील तीन वर्षात नाशिक जिल्ह्यात एकही वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेला एड्स व गुप्तरोगाची लागण झालेली नाहीये. त्यातून त्यांच्या माध्यमातून एड्सचा समाजात होणारा फैलाव मोठ्या प्रमाणात आटोक्यात आला आहे.

शिक्षित केले –

हे काम करत असतानाच जेव्हा प्रवरा मेडिकल ट्रस्टला लक्षात आलं की फक्त आरोग्यच नव्हे तर या वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांच्या एकूणच सामाजिक उन्नतीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि त्यातूनच खऱ्या अर्थाने या महिला किंवा त्यांची पुढची पिढी या दलदलीतून बाहेर येऊ शकेल त्यासाठी सर्वात आधी संस्थेने या महिलांचे अभ्यास वर्ग घ्यायला सुरुवात केली त्यानंतर त्या महिलांनाही शिक्षणाचे महत्व पटले. आणि त्यांनी आपल्या मुलांना शिक्षित करण्याकडे भर दिला.

शाळाबाह्य मुलं ही होती मोठी समस्या –

वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांची मुलंमुली मोठ्या प्रमाणामध्ये शाळाबाह्य होती. वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेंची मुलं म्हणून त्यांना शाळेत घेतील का? वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेनची मुलं म्हणून त्यांना शाळेत त्रास दिल जाईल? त्यांना चुकीच्या नजरेने बघितले जाईल का? अश्या न्यूनगंडातून तसेच स्वतः शिक्षित नसल्याने शिक्षणाच्या महत्वाची जाणीव नसल्याने या महिला आपल्या पाल्यांना शाळेत पाठवत नव्हत्या. ही बाब लक्षात घेऊन संस्थेने सर्वात आधी या मुलांना शिक्षणच्या मुख्य प्रवाहात आणायला सुरवात केली. पहिल्याच वर्षी 80 मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले गेले. त्यातील 25 मुलांना हॉस्टेल मध्ये ठेवण्यात आले होते. यात मुलींची संख्या लक्षणीय होती. 17 वर्षापूर्वीच्या पहिल्या बॅच मधील 25 मुली पुढे जाऊन परिचारिका झाल्या. त्यातील 4 मुली आज विदेशात परिचारिका म्हणून कार्यरत आहेत.

शिक्षित मुलांनी आपल्या आईला काढले दलदलीतून बाहेर –

मागील 17 वर्षात जी मुलं शिक्षित झाली. त्यांनी पुढे जात आपल जीवन सुखकर केल. आणि त्यानंतर आपल्या आईलाही वेश्या व्यवसायाच्या दलदलीतून बाहेर काढल. त्याचसोबत इतरही महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आता ही मूल मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. एकूणच या मुलांना शिक्षण नावच वाघिणीच दूध प्यायला मिळाल्यामुळे एक अख्खी पिढी आज वेश्या व्यवसायाच्या दृष्टचक्रातून बाहेर यायला मदत झाली आहे.

शिक्षणामुळे विचारसरणीत पडला फरक –

एकूणच वेश्या व्यवसायाच ठिकाण अर्थात कुंटणखान्यातील महिला, त्यांच्या आजूबाजूचे वातावरण त्यांची जीवनशैली तसेच त्याठिकाणी येणारे ग्राहक, त्यांची जीवनशैली याचा मोठा मानसिक परिणाम वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या मुलांवर वर्षानुवर्षे होत राहील. मात्र, शिक्षणाच्या निमित्ताने त्या ठिकाणाहून बाहेर पडल्याने तसेच समाजातील मुख्य प्रवाहात आल्याने त्या मुलांची जडणघडण अत्यंत मुक्त वातावरणात झाली त्यामुळे त्यांच्या एकूणच विचार प्रणालीत आमूलाग्र बदल झाला. जीवनाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोण मोठ्या प्रमाणात सकारात्मक बनलाय.

प्रशिक्षणातून स्वावलंबन  –

मागील दोन वर्षांपासून व्यवसाय बंद असल्याने तसेच त्याआधी कोविड काळात वेश्या व्यवसाय करणाऱ्या या महिलांवर रोजगाराचं मोठं संकट ओढवल. त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत दयनीय झाली. या व्यवसायात कोणतीही महिला स्वइच्छेने येत नाही. मात्र, इतर रोजगराचे इतर कोणतीही कला त्यांना अवगत नसल्याने त्या वर्षानुवर्ष कुंटणखाण्यातच अडकून पडतात. अशा परिस्थितीत या महिलांनी स्वावलंबी बनवण्याच्या हेतूने प्रवरा संस्थेने त्यांना ज्वेलरी मेकिंग, शिवणकाम, ब्युटीशियन आदि प्रकारची प्रशिक्षण दिली. आज अनेक महिला आपले व्यवसाय करून किंवा नोकरी करून आपला उदरनिर्वाह करत आहेत.