घरमहाराष्ट्रSSC Result 2021 : दहावीच्या निकालात मोठा बदल, आता विद्यार्थ्यांना चित्रकलेचेही अतिरिक्त...

SSC Result 2021 : दहावीच्या निकालात मोठा बदल, आता विद्यार्थ्यांना चित्रकलेचेही अतिरिक्त गुण मिळणार

Subscribe

कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता राज्य सरकारने इयत्ता १० वीच्या परीक्षा रद्द केल्या. यातच दहावीच्या निकालासंदर्भात आज राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मोठा बदल केला आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये आता चित्रकला परीक्षांचेही गुण समाविष्ट होणार आहेत. शैक्षणिक वर्षे २०२०-२१ या वर्षात जे दहावीचे विद्यार्थी यापूर्वी शासकीय रेखा कला परीक्षेत (एलिमेंटरी व इंटरमिजीएट ड्रॉईंग ग्रेड) उर्त्तीण झालेत. अशा विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळाच्या प्रचलित धोरणांनुसार अतिरिक्त गुण मिळणार आहे. असे राज्य शासनाच्या शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आता दहावी इयत्तेत असणाऱ्या आणि एलिमेंटरी पास झालेल्या परंतु इंटरमिजीएट ड्रॉईंग ग्रेड चित्रकला परीक्षांमध्ये बसता न आलेल्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण मिळणार आहेत.

परंतु ही सवलत फक्त अशाच दहावीच्या विद्यार्थ्यांना लागू होणार आहे, जे एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड परीक्षा उत्तीर्ण झालेत परंतु कोरोनामुळे इंटरमिजीएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षेस बसता आले नाही. या विद्यार्थ्यांना एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड परीक्षेस मिळालेल्या श्रेणीच्या आधारे सन २०२०-२१ मध्ये इ. १० वी परीक्षेत अतिरिक्त गुणांची सवलत दिली जाणार आहे. यासंदर्भातील आदेश नुकताच शालेल शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आपल्या ट्वीटर अकाउंटवरुन शेअर केला आहे.

- Advertisement -

या नव्या आदेशाप्रमाणे काय म्हटले आहे?

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केलेल्या आदेशात म्हटले आहे की, राज्यातील कोव्हीड-१९ या संसर्गजन्य साथ रोगाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शासकीय रेखाकला (एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा २०२१ चे आयोजन करण्यात येऊ नये, असा प्रस्ताव कला संचालनालयाच्या वर नमूद क्रमांक (४) येथील पत्रान्वये शासनास सादर करण्यात आला होता. त्यानुसार राज्यातील कोव्हीड-१९ या संसर्गजन्य साथ रोगाच्या प्रादूर्भावामुळे, तसेच, विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षिततेची बाब विचारात घेऊन शासकीय रेखाकला परीक्षा २०२० चे आयोजन न करण्याबाबतचा शासन निर्णय वर नमूद क्रमांक ६ नुसार दिनांक २६ मार्च, २०२१ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

- Advertisement -

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वर नमूद दिनांक १२ मे, २०२१ च्या शासन निर्णयान्वये सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. १०वी) परीक्षा रद्द करण्यात आली आहे. तसेच, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वर नमूद दिनांक २८ मे, २०२१ च्या शासन निर्णयान्वये शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ. १० वी) साठी मूल्यमापन करताना शासनाच्या व मंडळाच्या धोरणानुसार व तरतुदीनुसार दे. असलेल्या अन्य गुणंचा लाभ प्रचलित पद्धतीनुसार देण्यास मान्यता देण्यात आली आहे. कोरोनामुळे इंटरमिजिएट ड्राईंक ग्रेड परीक्षा आयोजित करणं शक्य नसल्यानं २०२०-२१ यै शैक्षणिक वर्षासाठी एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड परीक्षेस मिळालेल्या श्रेणीच्या आधारे सन २०२०-२१ मध्ये इ.१० वी परीक्षेत अतिरिक्त गुणांची सवलत देण्यात येईल.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -