घरमहाराष्ट्रनागपूरमुंबई-नागपूर जुन्या महामार्गावर एसटी बस-कंटेनरचा अपघात; 5 जणांचा मृत्यू

मुंबई-नागपूर जुन्या महामार्गावर एसटी बस-कंटेनरचा अपघात; 5 जणांचा मृत्यू

Subscribe

मुंबई-नागपूर जुन्या महामार्गावर एसटी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर अपघातात 13 जण जखमी झाले आहेत.

गेल्या काही महिन्यात वाहनांच्या अपघातात वाढ झाली आहे. या अपघातांमध्ये अनेकांनी आपला जीव गमवावा लागला आहे. पुन्हा एकदा आज मुंबई-नागपूर जुन्या महामार्गावर एसटी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर अपघातात 13 जण जखमी झाले आहेत. बुलढाण्यातील सिंदखेडराजा येथे ही भीषण घटना घडली. (ST bus-container accident on old Mumbai-Nagpur highway)

हेही वाचा – चित्रपट, नाट्य संगीतकार आनंद मोडक

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव ट्रक आणि एसटीच्या धडकेने हा भयंकर अपघात घडला आहे. या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. जखमींवर सिंदखेडराजा रुग्णालया येथे उपचार सुरु आहेत. तर अपघातास्थळी पोलीस आणि स्थानिकांकडून बचावकार्य सुरु असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. या अपघातात बस चालकाचा जागीच मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.

आज सकाळी 6.15 वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातग्रस्त झालेली बस आज (ता. 23 मे) सकाळी औरंगाबाद येथून वाशिमच्या दिशेने निघाली होती. पण मुंबई-नागपूर महामार्गावरील सिंदखेडराजा जवळच्या पळसखेड चमकत गावाजवळ या बसला भरधाव वेगात असणाऱ्या कंटेनरची धडक बसली. ज्यामध्ये बसच्या समोरील भागाचा चेंदामेंदा झाला आहे. तर बस चालकाला जागीच आपला जीव गमवावा लागला आहे. या अपघातातील 13 जखमींपैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेमुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -