घरताज्या घडामोडीमहापालिका निवडणुकांचे बिगुल वाजणार?, १७ मे रोजी अंतिम प्रभाग रचना होणार जाहीर

महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजणार?, १७ मे रोजी अंतिम प्रभाग रचना होणार जाहीर

Subscribe

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य निडणूक आयोगाला २ आठवड्यांमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने महापालिकांना आदेश दिले आहेत. अंतिम प्रभाग रचना शासनाच्या राजपत्रात १७ मे रोजी प्रसिद्ध करण्यात येतील, असं राज्य निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. यामुळे आता राज्यातील १४ महापालिकांच्या निवडणुकांचं बिगुल वाजण्याची दाट शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.

राज्य निवडणूक आयोगाने परिपत्रक जारी करत राज्य सरकारला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. ११ मे अंतिम प्रभाग रचना काम पूर्ण करा आणि १२ मे पर्यंत प्रभाग रचना अंतिम प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे मान्यता पाठवावी असे राज्य निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले आहे. राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, अमरावती, नवी मुंबई वसई विरार उल्हासनगर कोल्हापूर अकोला सोलापूर नाशिक , पिपंरी चिंचवड, कल्याण डोंबिवली महापालिकाना पत्र राज्य निवडणूक आयोगाने पत्र पाठवलं आहे.

- Advertisement -

या महापालिकांची प्रभाग रचना जाहीर होणार

राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, अमरावती, नवी मुंबई वसई विरार उल्हासनगर कोल्हापूर अकोला सोलापूर नाशिक , पिपंरी चिंचवड, कल्याण डोंबिवली या महापालिकांच्या प्रभाग रचना जाहीर होणार आहेत.

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. राज्य सरकारने कायदा करुन प्रभाग रचना करण्याचा अधिकार स्वतःकडे घेतला होता. राज्य निवडणूक आयोगाचे अधिकार कमी करण्यात आले होते. परंतु सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान राज्य निवडणूक आयोगाकडे प्रभाग रचनेचे अधिकार दिले आहेत. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचाना जाहीर करण्याची तारीख निश्चित करत राज्य सरकारला निर्देश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णायानंतर निवडणुकांच्या कामांमध्ये गती मिळाली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : महाराष्ट्रात कुठे-कुठे होणार मनपा निवडणुका ?

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -