घरमहाराष्ट्रपाकिस्तानी गस्तीनौकेच्या गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या मच्छीमारांच्या कुटुंबियांस ५ लाखांची मदत

पाकिस्तानी गस्तीनौकेच्या गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या मच्छीमारांच्या कुटुंबियांस ५ लाखांची मदत

Subscribe

मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांची माहिती

पाकिस्तान-ओखा (गुजरात) सागरी सीमारेषेवर शनिवार दिनांक ६ नोव्हेंबर रोजी पाकिस्तानी सुरक्षा एजन्सीकडून गुजरात राज्याच्या पोरबंदर जिल्ह्यातील मासेमारी नौकेवर झालेल्या गोळीबारात मृत पावलेल्या पावलेल्या श्रीधर चामरे यांच्या कुटुंबीयांस राज्य सरकारच्या वतीने रु. ५ लाखांची आर्थिक मदत करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी मंगळवारी दिली.

गुजरातमधील वनगबरा येथील मालक नानजी राठोड यांच्या ‘जलपरी’ बोटीवर पालघर तालुक्यातील वडराई गावातील श्रीधर चामरे हा गेल्या तीन महिन्यांपासून खलाशी म्हणून काम करीत होते.

- Advertisement -

गुजरात राज्याच्या ओखा बंदर येथील मासेमारी नौका ‘जलपरी’ मासेमारी करण्यास समुद्रात निघाली होती. ही मासेमारी नौका गुजरात राज्यातील ओखा येथे भारत पाकिस्तान हद्दा नजीक मासेमारी करीत असताना पाकिस्तानी मेरिटाईम सिक्युरिटी एजन्सीकडून भारतीय जलधी क्षेत्रात शिरकाव करून मासेमारी नौकेवर बेछूट गोळीबार करण्यात आला ज्यात पालघर जिल्ह्यातील वडराई गावातील तरुण मच्छिमार श्रीधर रमेश चामरे, वय ३०, यांचा या गोळीबारत दुर्दैवी मृत्यू झाला होता.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -