घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रभाजप राज्य अधिवेशनास गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीबाबत अद्यापही 'अनिश्चितता'

भाजप राज्य अधिवेशनास गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीबाबत अद्यापही ‘अनिश्चितता’

Subscribe

नाशिक : शहरात १० व ११ फेब्रुवारीला होत असलेल्या दोन दिवसीय राज्य अधिवेशनासाठी केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीची चर्चा होती. मात्र, अधिवेशन चार दिवसांवर आलेले असूनही त्यांच्या दौर्‍याचे नियोजन आलेले नाही. त्यामुळे शाह यांच्याविनाच अधिवेशन होण्याची शक्यता असून, पर्यायी नेतृत्वाचे नाव निश्चित झाले नसल्याचेही समजते.

लोकसभा व विधानसभा निवडणुका तसेच, महापालिका निवडणूक कोणत्याही क्षणी घोषित होण्याची शक्यता असल्याने या निवडणुकांची रणनीती ठरविण्यासाठी भाजप अधिवेशन आयोजित केले आहे. दोन दिवशीय अधिवेशनाचा कार्यक्रम सातपूरच्या डेमोक्रसी हॉटेलमध्ये आठशे पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत होणार आहे. पुढील वर्षाच्या निवडणुकांसाठी सज्ज होण्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रिय गृहमंत्री व वरिष्ठ नेतृत्व अमित शाह हे स्वतः अधिवेशनाला उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे भाजपच्या स्थानिक पदाधिकार्‍यांकडून अधिवेशन व सभेच्या दृष्टीने जय्यत तयारी करण्यात आली आहे.

- Advertisement -

मात्र, अद्यापही शहा यांच्या दौर्‍याचे निश्चित स्वरूप स्थानिक नेतृत्वापर्यंत पोहोचलेले नसल्याने त्यांच्या दौर्‍याबाबत अनिश्चितता आहे. राज्यस्तरीय अधिवेशनादरम्यान पंतप्रधान मोदी मुंबई दौर्‍यावर येणार आहेत. त्यामुळे हे अधिवेशन जलदगतीने घेण्याच्या हालचाली वाढल्या आहेत. एकीकडे या अधिवेशनात गृहमंत्री शहा यांची उपस्थिती होती. त्याचबरोबर भाजपचे केंद्रीय मंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री, राज्यातील सर्व 23 खासदार, 104 आमदार उपस्थित राहणार आहेत. भाजपचे राज्यभरातील 800 हून अधिक पदाधिकार्‍यांचा अधिवेशनात अंतर्भाव असेल. मात्र, मोदींच्या दौर्‍यामुळे अमित शहा नाशिकमध्ये येण्याची चिन्हे कमी आहेत. त्यामुळे शहा यांच्या अनुपस्थितीच्या चर्चेने पदाधिकारीदेखील चांगलेच संभ्रमात आहेत.

अधिवेशन एक दिवसीय की दोन?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा आटोपून राज्यातील चारही केंद्रिय मंत्री अर्थात नारायण राणे, कपिल पाटील, भागवत कराड, डॉ. भारती पवार हे विमानाने नाशिकला येतील. त्यामुळे कमी पदाधिकार्‍यांचा उपस्थितीत फास्ट फॉरवर्ड पद्धतीने अधिवेशन आटोपण्यात येणार असल्याचे समजते. त्यामुळे गृहमंत्री अमित शहा नाशिकला येणार का? भाजपचे दोन दिवसीय अधिवेशन एक दिवसाचे होईल का, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -