घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रभाजपचे मताधिक्य २८ टक्क्यांवरुन ५० टक्क्यावर येण्यासाठी रणनीती : विनोद तावडे

भाजपचे मताधिक्य २८ टक्क्यांवरुन ५० टक्क्यावर येण्यासाठी रणनीती : विनोद तावडे

Subscribe

नाशिक : पुढील लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे मताधिक्य २८ टक्क्यांवरून ५० टक्के वर येण्याची रणनीती भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत निश्चित केली जाणार आहे, अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांनी दिली. भाजपाला स्वबळावर सत्तेवर आणण्यासाठी प्रदेश कार्यकारणीची बैठक महत्त्वाची असून, या बैठकीत प्रामुख्याने राम मंदिराला विरोध करणार्‍या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गेलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची व गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून काँग्रेस-राष्ट्रवादीची मते भारतीय जनता पक्षाकडे वळविण्याबाबत विचार मंथन केले जात असल्याचेही ते म्हणाले.

भाजपच्या प्रदेश कार्यकारणीची बैठकीच्या निमित्ताने आलेल्या तावडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले की, सन २०१४ मध्ये सर्व पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढवली. त्यावेळी भारतीय जनता पक्षाला २८ टक्के मते पडली. शिवसेनेला १९ टक्के, काँग्रेसला १८ टक्के, तर राष्ट्रवादी काँग्रेसला १७ टक्के मते पडली. मात्र, आता परिस्थिती बदलली असून शिवसेनेने राम मंदिराला विरोध करणार्‍या काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत सत्ता स्थापन केल्यामुळे त्यांच्याकडील हिंदुत्ववादी मते संभ्रमित झाली आहे. यापूर्वी हिंदुत्वाची जी मते शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांमुळे होती ती काँग्रेस बरोबर गेल्यानंतर हलत असून, ही मते आता भारतीय जनता पक्षाकडे वळवण्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गरीब कल्याणाचे विषय मार्गी लावत असल्यामुळे काँग्रेस किंवा काही प्रमाणात राष्ट्रवादीकडे जी असणारी पारंपरिकमध्ये आता भाजपकडे वळत आहेत. अशी सर्व गोळा बेरीज करून ४५ ते ५० टक्क्यांपर्यंत मतांचा टक्का भाजपाकडे वळवण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -