अमरावतीमध्ये शाळेची भिंत कोसळली; एका विद्यार्थ्याचा मृत्यू

मणीबाई छगनलाल देसाई विद्यालयमध्ये आठवीचे वर्ग सुरु होते. वर्ग सुरु असतानाच अचानक भिंत कोसळली. या दुर्घटनेमध्ये वैभव गावंडे या १३ वर्षाच्या मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला. तर तीन विद्यार्थी जखमी झाले आहेत.

Dead body

शाळेची भिंत कोसळल्याची धक्कादायक घटना अमरावतीमध्ये घडली आहे. या दुर्घटनेमध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू तर तीन जण जखमी झाले आहेत. अमरावतीच्या भातकुली तालुक्यात ही घटना घडली आहे. आष्टी गावातील मणीबाई छगनलाल देसाई विद्यालयाची भिंत अचानक दुपारी एकच्या सुमारास कोसळली. वर्ग सुरु असतानाच अचानक ही घटना घडली. या घटनेनंतर तणावाचे वातावरण होते.

मणीबाई छगनलाल देसाई विद्यालयमध्ये आठवीचे वर्ग सुरु होते. वर्ग सुरु असतानाच अचानक भिंत कोसळली. या दुर्घटनेमध्ये वैभव गावंडे या १३ वर्षाच्या मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला. तर तीन विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे. मणिबाई देसाई विद्यालयाची इमारत जुनी असल्याचे समोर आले आहे. या घटनेने आष्टी येथे तणावाचे वातावरण पसरले आहे. आष्टी येथे आजूबाजूच्या गावांमधून अनेक विद्यार्थी शिकण्यासाठी येत असतात. जखमी विद्यार्थ्यांपैकी दोघे जण देवरी आणि अनकवाडी येथील आहेत.

हेही वाचा – 

शैक्षणिक सहलीत विद्यार्थ्याचा मृत्यू