घरमहाराष्ट्रपिंपरी-चिंचवडमध्ये संतापलेल्या परिक्षार्थींचा रुग्णालयात गोंधळ

पिंपरी-चिंचवडमध्ये संतापलेल्या परिक्षार्थींचा रुग्णालयात गोंधळ

Subscribe

पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या वाय.सी.एम रुग्णालयातील विविध ९७ कंत्राटी जागांसाठी आज लेखी परीक्षा होती. परंतु, अचानक ती रद्द करण्यात आली असून पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे संतप्त परिक्षार्थींनी रुग्णालयात गोंधळ घातला. परिक्षेसाठी अवघ्या महाराष्ट्रातून ९७ पदांसाठी तब्बल ४ हजार अर्ज आले होते. २६ आणि २७ डिसेंबरला म्हणजे आजच्या दिवशीची परीक्षा रद्द करण्यात आली. यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या विद्यार्थ्यांची गैरसोय झाली.

पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पुणे जिल्ह्यातून रुग्ण येतात. याच परिसरात वैद्यकीय विद्यालय देखील बांधण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णालयाला विशेष महत्त्व आहे. ब्लड बँक टेक्निशियन, ब्लड बँक कॉन्सिलर, एम.एस.डब्ल्यू, डाटा एन्ट्री ऑपरेटर, डायलेसिस टेक्निशियन, फार्मासिस्ट, एक्स-रे टेक्निशियन, जी.एन.एम स्टाफनर्स, लॅब टेक्निशियन, पुरुष कक्ष मदतनीस, स्त्रीकक्ष मदतनीस अश्या विविध ९७ कंत्राटी पदाच्या जागेसाठी भरती करण्यात येत आहे.

- Advertisement -

त्याचे परीक्षार्थींकडून अर्ज मागविण्यात आले होते. दहा दिवसांच्या मुदतीमध्ये महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून तब्बल चार हजार अर्ज आले आहेत. अर्जदारांची पहिल्या टप्प्यातील आणि आज दुसऱ्या टप्यातील लेखी परीक्षा होती. मात्र, ती अचानक रद्द करण्यात आली. यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या परिक्षार्थींची गैरसोय झाली. संतापलेल्या परीक्षार्थींनी गोंधळ घालत आपला संताप व्यक्त केला. या भरतीमध्ये नक्कीच काहीतरी घोटाळा झाला असल्याचा आरोप परिक्षार्थींनी केला आहे. अद्याप पुढील लेखी परीक्षा कधी आहे? हे निश्चित करण्यात आले नाही.

एवढे परीक्षार्थी येतील अस वाटलं नव्हतं, मात्र चार हजार जणांनी ९७ जागांसाठी अर्ज केले आहेत. अर्जदारांचे अर्ज पडताळून पात्र, अपात्र पाहून पात्र उमेदवाराला लेखी परीक्षेला बसता येईल. या सर्व प्रक्रियेला उशीर लागेल.
– राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -