घरताज्या घडामोडीआम्ही सर्व कुटुंब 'या' लढ्यामध्ये एकत्र, संजय राऊतांच्या कारवाईवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

आम्ही सर्व कुटुंब ‘या’ लढ्यामध्ये एकत्र, संजय राऊतांच्या कारवाईवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

Subscribe

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. राऊतांवर कारवाई झाल्यानंतर राजकीय वर्तुळातून अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच शिवसेनेकडून देखील संतप्त प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर अद्यापही कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान, आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र आहोत, अशा प्रकारची प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

आम्ही सर्व कुटुंब ‘या’ लढ्यामध्ये एकत्र

- Advertisement -

सुप्रिया सुळे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या की, देशात आणि राज्यात काहीही झालं तरी शरद पवार यांच्याशिवाय ती गोष्ट पूर्ण होत नाही. नवाब मलिक, अनिल देशमुख आणि संजय राऊत यांबाबतच्या गोष्टी आम्हाला अपेक्षित होत्या. कारण आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र आहोत. आरोप झाल्यानंतर पहिल्याच दिवसापासून सर्व तपाप संस्थांना सहकार्य करायचे, असे आम्ही ठरवले होते, आम्ही आमचे कुटुंब आणि देशाला उत्तरदायी आहोत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

राऊतांच्या कारवाईनंतर शरद पवार गप्प का?

- Advertisement -

संजय राऊत यांच्यावर कारवाई केल्यानंतरही शरद पवार गप्पा का?, असा सवाल पत्रकारांनी सुप्रिया सुळे यांना विचारला असता, त्या म्हणाल्या की, देशात आणि राज्यात काहीही झालं तरी शरद पवार यांच्याशिवाय ती गोष्ट पूर्ण होत नाही. नवाब मलिक, अनिल देशमुख असो किंवा आता संजय राऊत, आम्हाला या गोष्टी अपेक्षित होत्या. आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र आहोत.

दरम्यान, शरद पवारांच्या मौनावर उद्धव ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. तुम्ही बोला ना, मला या प्रश्नांना उत्तरं द्यायची नाहीत. कारण मी संजय राऊत यांच्या घरी जाऊन आलो. मी पुन्हा सांगतो की संजय राऊत आणि आमचे कौटुंबिक संबंध चांगले आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.


हेही वाचा : राणा दाम्पत्याचे कुख्यात युसूफ लकडावाल्याशी आर्थिक संबंध! राऊतांच्या आरोपांची पुन्हा चर्चा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -