घरताज्या घडामोडीमुंबईत गोवरच्या ८ रुग्णांचा संशयित मृत्यू ; रुग्णांची संख्या दुप्पट

मुंबईत गोवरच्या ८ रुग्णांचा संशयित मृत्यू ; रुग्णांची संख्या दुप्पट

Subscribe

मुंबई शहर व उपनगरात विशेषतः गोवंडी भागात गोवरचा प्रादुर्भाव वाढला आहे. गोवरमुळे गुरुवारी गोवंडी येथील ६ महिन्यांच्या मुलीचा संशयित मृत्यू झाला आहे. तिने व तिच्या पालकांनी ठाण्यात वास्तव्य केले होते. त्यामुळे कालपर्यंत गोवरमुळे मृत पावलेल्या रुग्णांची संख्या ७ वरून ८ वर गेली आहे. तर गोवर बाधित संशयित रुग्णांची संख्या १,२६३ वरून २,६२३ एवढी म्हणजे दुप्पटपेक्षाही जास्त झाली आहे.

दरम्यान, आज मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोवरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महत्वाची बैठक घेऊन आढावा घेतला व आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत आदेश राज्य व मुंबई महापालिका आरोग्य यंत्रणेला दिले.

- Advertisement -

याबाबत महापालिकेकडून प्राप्त माहितीनुसार, गोवरचा वाढता प्रादुर्भाव पाहता पालिकेने कस्तुरबा रुग्णालयात विशेष कक्षाची स्थापना केली आहे. सध्या या रुग्णालयात यशस्वी उपाचारानंतर ३८ रुग्णांना घरी पाठविण्यात आले आहे. तर १०५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. २ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

मुंबईमध्ये गेल्या दोन महिन्यात गोवरच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत वरकरणी माहितीनुसार १८४ होती मात्र प्रत्यक्षात रुग्ण संख्या १६९ असल्याची माहिती समोर आली आहे. तर संशयित रुग्णांची संख्या २,६२३ एवढी नोंदविण्यात आली आहे.

- Advertisement -

मुंबईत २१ लाख ५१ हजार २४ घरांचा सर्व्हे

महापालिका आरोग्य यंत्रणेने, गोवंडी विभागात १ लाख ६१ हजार ७३७ घरांचा सर्व्हे केला आहे. तर संपूर्ण मुंबईत २१ लाख ५१ हजार २४ घरांचा सर्व्हे करण्यात आला आहे. यामध्ये, ताप आणि लाल पुरळ असलेल्या २,६२३ संशयित रुग्णांचा समावेश आहे.

जानेवारीपासून आतापर्यंत गोवरचे १६९ रुग्ण आढळून आले आहेत. त्यात, ० ते ८ महिन्याचे १४ रुग्ण, ९ ते ११ महिने ७ रुग्ण, १ ते ४ वर्ष ५२ रुग्ण, ५ ते ९ वर्षे २१ रुग्ण, १० ते १४ वर्षे ६ रुग्ण, १५ आणि त्यावरील ५ रुग्ण असे एकूण १०५ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. तसेच, आतापर्यंत १२ हजार ८७० मुलांचे आणि गरोदर महिलांचे लसीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.


हेही वाचा : अयोध्यानगरीत महाराष्ट्र भक्तनिवास उभारावे, राहुल नार्वेकरांची मुख्यमंत्र्यांकडे


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -