घरताज्या घडामोडी'कदाचित काही जिल्हे कर्नाटकात नेले जाऊ शकतात...', आदित्य ठाकरेंना आता अमित शाहांच्या...

‘कदाचित काही जिल्हे कर्नाटकात नेले जाऊ शकतात…’, आदित्य ठाकरेंना आता अमित शाहांच्या बैठकीवरच शंका

Subscribe

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण तापले आहे. अशातच बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक बैठक घेतली. या बैठकीवर ठाकरे गटाचे नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी वेगळीच शंका उपस्थित केली.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण तापले आहे. अशातच बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक बैठक घेतली. या बैठकीवर ठाकरे गटाचे नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी वेगळीच शंका उपस्थित केली. ‘कदाचित कर्नाटकाच्या निवडणुकीसाठी आमच्या इथले काही जिल्हे तिकडे नेले जाऊ शकतात’, अशी शंका आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केली. (thackeray group mp aaditya thackeray claims that some districts of maharashtra may be taken there for karnataka elections)

अमित शाह यांनी घेतलेल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलतना आदितय ठाकरे यांनी सांगितले की, “जो काही वादविवाद आहे तो आपल्याच देशातील दोन राज्यांमध्ये आहे. असे वाद सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू आहेत. काही निकाली निघाले आहेत. कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांकडून जो आक्रमकपण दिसत आहे, तो कदाचित निवडणुकीसाठी असू शकतो. जसे गुजरात निवडणुकीसाठी आमच्या इथले काही प्रकल्प तिकडे नेले. त्याचप्रकारे कदाचित कर्नाटकाच्या निवडणुकीसाठी आमच्या इथले काही जिल्हे तिकडे नेले जाऊ शकतात. दु:ख हेच आहे की प्रत्येक वेळी महाराष्ट्राला यातना होतात, मात्र कोणाला वाईट वाटत नाही”, असे आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण तापले आहे. अशातच बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक बैठक घेतली. यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई उपस्थित होते. महाराष्ट्र कर्नाटक सीमावादप्रश्नी दोन्ही राज्यांनी आपापल्या भूमिका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर मांडल्या. गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यात सुरू झालेला सीमावाद मिटवण्यासाठी आणि घटनात्मक मार्ग शोधण्यासाठी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. दोन्ही राज्यांच्या नेत्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली.


हेही वाचा – Smoke Free Country : ‘या’ देशात सिगारेट ओढण्यावर बंदी, कडक कायदा लागू

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -