घरताज्या घडामोडीराजकारण बंद करा, सन्मानाने आलात सन्मानाने जा; संजय राऊतांचा योगींवर निशाणा

राजकारण बंद करा, सन्मानाने आलात सन्मानाने जा; संजय राऊतांचा योगींवर निशाणा

Subscribe

"हे राजकारणाचे धंदे बंद करा. आपण सन्मानाने आला आहात, सन्मानाने निघून जा. चर्चा करा. तुमच्याबद्दलचं प्रेम-आदर आम्हाला राहील. पण हे राजकीय उद्योग इथे येऊन शक्यतो करू नका'', असा सल्लाही संजय राऊतांनी योगी आदित्यनाथ यांना दिला.

योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्यावर आक्षेप नसून ते राजकारण करत असतील, तर आक्षेप असेल. हे राजकारणाचे धंदे बंद करा. आपण सन्मानाने आला आहात, सन्मानाने निघून जा. चर्चा करा. तुमच्याबद्दलचं प्रेम-आदर आम्हाला राहील. पण हे राजकीय उद्योग इथे येऊन शक्यतो करू नका, अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली. (Thackeray Group MP Sanjay Raut Slams UP CM Yogi Adityanath)

संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना योगी आदित्यानात यांच्यावर निशाणा साधला. योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्यावर आक्षेप नसून ते राजकारण करत असतील, तर आक्षेप असेल. मुख्यमंत्र्यांच्या भेटीगाठी होत असतात. पण ते मुंबईत रोड शो कशासाठी करतायत? जर ते इथल्या उद्योगपतींना भेटायला आले असतील. त्यांच्या राज्याच्या विकासाबाबत चर्चा करणार असतील, तर त्यावर आक्षेप घेण्याचं कारण नाही. पण आमच्याकडचे उद्योग ओरबाडून नेणार असतील, तर आमचा आक्षेप आहे. योगी आदित्यनाथ मुंबईत गुंतवणुकीसाठी रोड शो करणार असतील, तर आश्चर्यकारक आहे. गुंतवणुकीसाठी मुंबईत रोड शो करण्याची गरज काय? आपण इथे राजकारण करायला आला आहात की आपल्या राज्याच्या विकासासाठी मुंबईची मदत घ्यायला आला आहात?, असे सवाल उपस्थित करत संजय राऊत यांनी योगींवर निशाणा साधला.

- Advertisement -

“मी वाचलं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत दावोसला कॉन्फरन्ससाठी चालले आहेत. तिथे जाऊन आमचे मुख्यमंत्री-उद्योगमंत्री गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी रोड शो करणार आहेत का दावोसच्या रस्त्यावर? मग यूपीच्या मुख्यमंत्र्यांना ताजमहाल हॉटेलसमोर रोड शो करण्याची गरज काय?” असाही सवाल राऊतांनी उपस्थित केला.

याशिवाय, “हे राजकारणाचे धंदे बंद करा. आपण सन्मानाने आला आहात, सन्मानाने निघून जा. चर्चा करा. तुमच्याबद्दलचं प्रेम-आदर आम्हाला राहील. पण हे राजकीय उद्योग इथे येऊन शक्यतो करू नका”, असा सल्लाही संजय राऊतांनी योगी आदित्यनाथ यांना दिला.

- Advertisement -

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्याची सध्या जोरदार चर्चा होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांशी त्यांच्या भेटीगाठींमुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्यावर टीका केली आहे.


हेही वाचा – सायरस मिस्त्री अपघात प्रकरण : डॉ. अनाहिता पंडोले यांच्याविरुद्ध चार्जशिट दाखल

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -