घरताज्या घडामोडीगुजरात निवडणुका जिंकण्यासाठी पंतप्रधानांनी बाजी लावली; संजय राऊतांचा टोला

गुजरात निवडणुका जिंकण्यासाठी पंतप्रधानांनी बाजी लावली; संजय राऊतांचा टोला

Subscribe

पंतप्रधान म्हणूनही मोदींनी एक मोठा कालखंड गुजरालाच दिलेला आहे. ही त्यांची दुसरी टर्म आहे तरीही गुजरात निवडणुका जिंकण्यासाठी पंतप्रधानांना बाजी लावावी लागली. भारतीय जनता पक्षाचे तिकडे किती मोठे स्थान आहे हे यावरून स्पष्ट होते, अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला.

पंतप्रधान म्हणूनही मोदींनी एक मोठा कालखंड गुजरालाच दिलेला आहे. ही त्यांची दुसरी टर्म आहे तरीही गुजरात निवडणुका जिंकण्यासाठी पंतप्रधानांना बाजी लावावी लागली. भारतीय जनता पक्षाचे तिकडे किती मोठे स्थान आहे हे यावरून स्पष्ट होते, अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज सुरू आहे. मतदानाला सुरूवात झाल्यानंतर पंतप्रधानांनी मतदानाचा हक्क बजावला. (Thackeray Group MP Sanjay Raut Talk On Gujarat Eletion 2022 and slams PM Narendra Modi )

गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी पंतप्रधानांना टोला लगावला. राऊत म्हणाले की, “देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मधल्या काळात गुजरात बराच वेळा दिला. पंतप्रधान मोदी हे गुजरातचे तीन वेळा मुख्यमंत्री होते. पंतप्रधान म्हणूनही मोदींनी एक मोठा कालखंड गुजरालाच दिलेला आहे. ही त्यांची दुसरी टर्म आहे तरीही गुजरात निवडणुका जिंकण्यासाठी पंतप्रधानांना बाजी लावावी लागली. भारतीय जनता पक्षाचे तिकडे किती मोठे स्थान आहे हे यावरून स्पष्ट होते”

- Advertisement -

“खरं म्हणजे कोणत्याही प्रचाराशिवाय त्यांनी ती निवडणूक जिंकायला पाहिजे होती. पण पंतप्रधान, गृहमंत्री, भाजपा पक्षाध्यक्ष, संपूर्ण केंद्रीय यंत्रणा यांचासोबत गुजरातमध्ये मोदींनी प्रचार केला. तरीही निकाल काय लागेल हे सांगू शकत नाही, निकाल काहीही लागू द्या. लोक असे म्हणतात की निवडणूक यंत्रणेवरती आमचा विश्वास नाही. म्हणजे सरकारच्या विरुद्ध लोकभावना असली, तरी तेच जिंकतील. ही लोकशाही आहे, असे होणार नाही. मशिनीत गडबड करून-करून किती करणार. ही लोकांची भावना आहे. त्यामुळे निकालाची वाट पाहुया”, असेही संजय राऊत म्हणाले.


हेही वाचा – युतीच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात आज पहिलीच बैठक

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -