घरदेश-विदेशहिजाबसक्तीवरून इराण सरकार नरमले, महिलांच्या आंदोलनाला यश

हिजाबसक्तीवरून इराण सरकार नरमले, महिलांच्या आंदोलनाला यश

Subscribe

इराणमध्ये महिलांनी हिजाब (Protest Against Hijab in Iran) घालावं याकरता संस्कृतीरक्षक पोलीस पथक नेमण्यात आले होते. याविरोधात इराणमधील महिलांनी तुफान आंदोलन केले. दोन महिने चाललेल्या आंदोलनाची दखल आता इराण सरकारने घेतले असून हिजाबसक्तीबाबत सरकारने नरमाईची भूमिका घेतली आहे. त्यानुसार, इराणमधील संस्कृतीरक्षक पोलीस हे पथक बंद करम्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

हेही वाचा मतदान केल्यानंतर पतंप्रधान नरेंद्र मोदींनी दिली प्रतिक्रिया, निवडणूक आयोगाचं कौतुक करत म्हणाले…

- Advertisement -

संस्कृतीरक्षण पोलीस हे पथक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, हा निर्णय कायमस्वरुपी नसून तात्पुरत्या स्वरूपासाठी घेण्यात आला आहे, अशी माहिती इराणचे अॅटर्नी जनरल मोहम्मद जाफ मोंटाझेरी यांनी दिली.

इराणमध्ये सार्वजनिक ठिकाणी महिलांनी हिजाब परिधान करणे अनिवार्य करण्यात आले आहे. यासाठी संस्कृतीरक्षक पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे. महसा अमिनी या २२ वर्षीय तरुणीने हिजाबसंदर्भातील नियमांचे उल्लंघन केले. यावरून तिला संस्कृतीरक्षक पोलिसांनी तिला अटक केली. अटक झाल्यानंतर तिची प्रकृती खालावली गेली. त्यामुळे तिचा रुग्णालयातच मृत्यू झाला. संस्कृतीरक्षक पोलिसांनी तिचा जीव घेतल्याचा आरोप करत इराणमधील महिला पेटून उठल्या.

- Advertisement -

हेही वाचा – काश्मीरमध्ये कुरिअरने होतेय दहशतवाद्यांना फंडिंग; पाकिस्तानी संघटनेचा डाव, एसआयएकडून पर्दाफाश

महसा अमिनला अटक केल्यानंतर पोलिसांनी तिला मारहाण केली, असा आरोप तिच्या घरच्यांनी केला होता. अनेक महिलांनी रस्त्यावर उतरत संस्कृती रक्षक पोलिसांविरोधात आंदोलन छेडले. हिजाब जाळत त्यांनी हिजाबसक्तीला पूर्ण विरोध केला. तसंच, जगभरातील अनेक विचारवंत, कलाकार, खेळाडू यांनी पाठिंबा दिला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -