Eco friendly bappa Competition
घर ठाणे भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी उपाययोजना करणार- अदिती तटकरे

भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी उपाययोजना करणार- अदिती तटकरे

Subscribe

राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भविष्यात अशा दुर्दैवी घटना घडू नयेत, यासाठी योग्य ती उपाययोजना करणार असल्याचं त्या म्हणाल्या.

ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत 17 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत 13 रुग्ण हे आयसीयूमधील आणि 4 रुग्ण हे जनरल वॉर्डमधले होते. तर काही रुग्णांचे वय 80 वर्षापेक्षा जास्त असल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. या घटनेची माहिती स्वत: आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी घटनास्थळी पोहोचून घेतली आहे. आता यावर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भविष्यात अशा दुर्दैवी घटना घडू नयेत, यासाठी योग्य ती उपाययोजना करणार असल्याचं त्या म्हणाल्या. ( Thane Chhatrapati Shivaji Maharaj Hospital Measures will be taken to prevent such incidents Aditi Tatkare Kalwa Thane )

आरोग्य सुविधा बळकट करण्याच्या दृष्टीकोनातून ठाणे जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्याही मोठा जिल्हा आहे. एका बाजूला सिव्हील हॉस्पिटलच काम सुरू असताना कुठे ना कुठे तरी आरोग्य व्यवस्थेच विस्तारीकरण गरजेच आहे, असं अदिती तटकरे म्हणाल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सुचनेनुसार जी समिती नेमली जाईल. त्या समितीला विभागानुसार आरोग्य सुविधा वाढवण्याची गरज आहे का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यावर अभ्यास करुन योग्य तो निर्णय घेतला जाईल, असं अदिती तटकरे म्हणाल्या.

- Advertisement -

तसंच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या सर्व बाबतीत संवेदनशील आणि तत्पर आहेत. भविष्यात अशा प्रकारच्या दुर्दैवी घटने घडू नये, यासाठी लागणाऱ्या उपाययोजना या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली केल्या जातील, असं आश्वासन अदिती तटकरे यांनी यावेळी दिलं.

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राकेश बारोट (Dr. Rakesh Barot) यांनी या मृत्यू प्रकरणी पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिले आहे. राकेश बारोट म्हणाले की, काल रात्री आमच्याकडे 18 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. यातील 6 रुग्ण असे होते की, जे 24 तासाच्या आत गेलेले आहे. यातील 5 रुग्ण असे होते, ज्यांना ताप आणि दम लागणं हे कारण होतं. या सर्व रुग्णांचे पेटलेट्स 6000 होते. असे अत्यावश्यक रुग्ण येतात. ते आलेल्या आम्ही त्यांच्यावर उपचार करायला सुरूवात करतो. यातील एक रुग्ण अशी होती, जिचं अल्सर फुटलेलं होतं. ती रुग्ण इतकी अत्यावस्थ होती की, अगदी 5 मिनिटं उशिरा झाला असता तर जागीच मृत्यू झाला असता. तिच्यावर आम्ही उपचार करण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही तिला वाचवू शकलो नाही.

- Advertisement -

- Advertisment -