घरमहाराष्ट्र...म्हणूनच 50 आमदारांनी माझ्यावर विश्वास दाखवला, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर पलटवार

…म्हणूनच 50 आमदारांनी माझ्यावर विश्वास दाखवला, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर पलटवार

Subscribe

अखिल भारतीय बडगुजर समाजाचं महाअधिवेशनाला मुख्यमंत्री उपस्थिती दर्शवणार नाहीत, असं बोललं जात होतं. परंतु त्यांनी उपस्थिती दर्शवली आणि मान्यवरांनी त्यांचे आभारही मानले

जळगावः पाचोरा तालुक्यातील लोहारीत अखिल भारतीय बडगुजर समाजाचं महाअधिवेशन संपन्न झालं. त्या अधिवेशनाला उपस्थिती दर्शवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जोरदार भाषण केलं आहे. मी दिलेला शब्द पाळतो म्हणूनच 50 आमदारांनी माझ्यावर विश्वास दाखवला, म्हणूनच मी मुख्यमंत्री झालो, असं म्हणत एक बार जो मैने कमिटमेंट कर दी, तो मैं खुद की भी नहीं सुनता, अशी जोरदार फटकेबाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे. अखिल भारतीय बडगुजर समाजाचं महाअधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

अखिल भारतीय बडगुजर समाजाचं महाअधिवेशनाला मुख्यमंत्री उपस्थिती दर्शवणार नाहीत, असं बोललं जात होतं. परंतु त्यांनी उपस्थिती दर्शवली आणि मान्यवरांनी त्यांचे आभारही मानले. कार्यक्रम छोट्या स्वरूपाचा असल्याने मुख्यमंत्री येणार नाहीत, असं खुद्द कार्यक्रमाच्या आयोजकांनाच वाटत होते. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ”एक बार जो मैने कमिटमेंट कर दी, तो मैं खुद की भी नहीं सुनता,” असं सांगितलं. समाज छोटा असला तरी आपण मनाने मोठे आहोत, दिलेला शब्द पाळतो, असंही त्यांनी सांगितलं. तसेच मी माझ्या राजकीय जीवनात दिलेला शब्द पडू देत नाही, ही माझी काम करण्याची पद्धत असल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अधोरेखित केलं.

- Advertisement -

शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेल्याच्या विधानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, शरद पवार हे मोठे नेते आहेत. मात्र आम्ही कालही कार्यकर्ते म्हणून काम करत होतो. आजही कार्यकर्ते म्हणून काम करीत आहोत. महाराष्ट्राच्या जनतेचे सेवक म्हणून आम्ही काम करत आहोत, असे म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी शरद पवार यांना टोला लगावला. दरम्यान, मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. तसेच दोन्ही संघटनांनी मुख्यमंत्र्यांकडे विविध मागण्यासंदर्भात निवेदनही दिलं. शिंदे-फडणवीस सरकार मराठा आरक्षणावर मौन का?, तो प्रश्न मार्गी लावा, अशी आग्रही मागणीही या दोन्ही संघटनांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.


हेही वाचाः रोहित पवार करणार महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे नेतृत्व; अध्यक्षपदी निवड

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -