घरक्रीडारोहित पवार करणार महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे नेतृत्व; अध्यक्षपदी निवड

रोहित पवार करणार महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे नेतृत्व; अध्यक्षपदी निवड

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (MCA) अध्यक्षपदी निवड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या दोन नातवांमध्ये महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली होती. यामध्ये रोहित पवार यांनी पहिल्याच प्रयत्नात बाजी मारली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (MCA) अध्यक्षपदी निवड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या दोन नातवांमध्ये महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली होती. यामध्ये रोहित पवार यांनी पहिल्याच प्रयत्नात बाजी मारली. दरम्यान, या निवडणुकीसाठी महाराष्ट्राचा माजी कर्णधार शंतनु सुगवेकर निवडणुकीच्या रिंगणात उतरला होता. मात्र, त्याला फारशी साथ मिळाली नाही. (NCP MLA Rohit Pawar Elected As Maharashtra Cricket Association President Ncp Senior Leader Sharad Pawar)

या निवडणुकीसाठी कार्यकाल संपलेल्या पदाधिकाऱ्यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) मार्गदर्शक तत्त्वांनुसार लांब राहावे लागणार होते. सत्तारुढ गटाचे सर्वच उमेदवार यामुळे बाहेर जाणार होते. त्यामुळे सत्तारुढ गटाकडून रोहित पवार यांचे नाव पुढे करण्यात आले होते.

- Advertisement -

गेली दोन वर्षे अधिकृत घटनेच्या वादात अडकलेल्या महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या निवडणूकीत बाजी मारण्यासाठी रोहित पवार यांना पुढे करण्याचा निर्णय चांगलाच यशस्वी ठरला. दरम्यान, महाराष्ट्राचा माजी कर्णधार शंतनु सुगवेकर निवडणुकीच्या रिंगणात उतरला होता. मात्र, त्याला फारशी साथ मिळाली नाही. या निवडणुकीत रोहित पवारांनी एकतर्फी बाजी मारली.

शंतनु सुगवेकर आणि घटनादुरुस्तीसाठी पाठपुरावा करणारे अभिषेक बोके दोघेही रोहित पवारांपासून खूप दूर राहिले. या निवडणूकीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणापासून क्रीडा क्षेत्रातही आपले निर्विवाद वर्चस्व राखणारे शरद पवार यांचे दोन नातू या निवडणूकीच्या रिंगणात होते.

- Advertisement -

रोहित पवार आणि शरद पवारांचे भाचे जावई विक्रम बोके यांचा मुलगा अभिषेक हे यावेळी एकमेकांविरुद्ध उभे होते. मात्र, अभिषेक बोके या निवडणूकीत फारच फिके पडले. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेची यापूर्वीची निवडणूक बेकायदेशी असल्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट असून त्यासंदर्भात लवकरच निर्णय अपेक्षित असल्याचे समजते. पण, या निकालापूर्वीच नवी निवडणूक देखील पार पडली.


हेही वाचा – IND vs SL 3rd T20: भारताचा श्रीलंकेवर 91 धावांनी दमदार विजय

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -