Thursday, March 4, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नाशिक काँग्रेस काढतेय गेल्या निवडणूकीचे उट्टे

काँग्रेस काढतेय गेल्या निवडणूकीचे उट्टे

सहयोगी पक्षांबाबत नाराजीचा सूर : महापालिका निवडणुकी ‘एकला चलो रे’

Related Story

- Advertisement -

नाशिक । गेल्या महापालिकेच्या निवडणूकित सहयोगी पक्षाने आपल्याच उमेदवारासमोर उमेदवार उभे केल्याने पक्षाचे मोठे नुकसान झाले. आपल्याच उमेदवारांची पळवापळवी करण्यात आली त्यामुळे आगामी महापालिका निवडणूका स्वबळावर लढविण्यासाठी आतापासून तयारी लागा असे आवाहन काँग्रेस नेत्यांनी केले. नाशिक महापालिका निवडणुकिच्या पार्श्वभुमीवर शहर कार्यालयात शनिवारी बैठक घेण्यात आली.

यावेळी आमदार सुधीर तांबे, आमदार हिरामण खोसकर, पक्ष निरीक्षक श्री योगेंद्र पाटिल उपस्थित होते. आमदार सुधीर तांबे यांनी यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करतांना सांगितले की, कार्यकर्त्यांनी तळागळातील जनतेपर्यंत पोहोचून जनतेची कामे करण्याचे करावीत. आमदार हिरामण खोसकर म्हणाले की, पक्षाचे काम प्रामाणिकपणे करत राहिल्यास यश हमखास मिळते, याचे ज्वलंत उदाहरण मी स्वतः आहे. मी एका सामान्य कुटुंबात मधून राजकारणाची सुरुवात करून आता आमदार पदावर पोहोचलो आहे. पक्षाचे काम प्रामाणिकपणे व एक निष्ठेने केल्यास मतदार आपल्या पाठीशी उभा राहतो. आघाडी धर्म पाळत असतांना सहयोगी पक्षाने अनेक ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या विरोधात उमेदवार दिल्याने पक्षाचे नुकसान झाल्याची खंत शहराध्यक्ष शरद आहेर यांनी व्यक्त केली. काँग्रेस पक्षाचे उमेदवार पळविण्याचे काम सहयोगी पक्षाने केल्याची खंतही त्यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केली. आगामी काळात सर्व जागा पक्ष लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

प्रदेश प्रवक्त्या डॉ.हेमलता पाटील यांनीही पक्षातील काही नेते पक्षाची हानी करण्याचे काम करत असल्याचे मत व्यक्त केले. संघटना मजबूत करण्याकडे त्यांनी लक्ष वेधले. आणि नाशिक महानगरपालिकेच्या कारभारावर त्यांनी टीका केली. काँग्रस गटनेते नगरसेवक शाहू खैरे यांनी नाशिक महानगरपालिका ही ठेकेदार चालवतात की काय असा संशय येतो असे सांगत आगामी काळात नाशिक महानगरपालिकेतील चुकीच्या कारभाराविरोधात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मोठे आंदोलन उभे केले जाणार असल्याचे सांगितले.

यावेळी ज्येष्ठ नेते राजेंद्र बागुल, नगरसेवक राहुल दिवे, बबलु खैरे, वसंत ठाकूर आदिंनी संबोधित केले. यावेळी माजी नगरसेवक सिराज भाई कोकणी, माजी नगरसेवक लक्ष्मण जायभावे, गुलजार कोकणी, वसंतराव मोराडे, नगरसेविका आशाताई तडवी, अल्पसंख्यांक अध्यक्ष हनीफ बशीर, मध्य नाशिक ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष बबलू खैरे आदिंसह आजी, माजी नगरसेवक, पदाधिकार, कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisement -