घरठाणेभाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेतील वाद पुन्हा चव्हाट्यावर

भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेतील वाद पुन्हा चव्हाट्यावर

Subscribe

म्हस्के यांची मिम्सद्वारे उडवली खिल्ली

ठाणे : दिव्यातील डम्पिंग असो या नागरी सुविधा यावरून भाजपाने सत्ताधाऱ्यांना नेहमी कोंडी पडण्याचे काम केले. त्यामुळे त्यांच्यातील वाद अद्यापही संपण्याचे नाव घेत नाही. त्यातच शिवसेनेकडून आयोजित दिवा महोत्वसादरम्यान बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी दिव्याच्या विकासावरुन केलेल्या भाषणाचे भाजपकडून मिम्स तयार करत, त्यांची खिल्ली उडवली आहे. तसेच ते मिम्स सोशल मिडियावर वायरल करत, नरेश म्हस्के यांचे डोके ठिकाणावर आहे का? असा सवालही यात उपस्थित करण्यात आला आहे. त्याला उत्तर म्हणून आम्ही शांत असून आमचा संयम सोडला तर पळता भुई थोडी करु असा इशारा बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाच्या वतीने भाजपला देण्यात आला आहे. यावरून त्यांच्यातील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

गेल्या महिन्यात दिव्यात डम्पींगच्या मुद्यावरुन हे दोन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले होते. त्यानंतर आता ठाण्यातही भाजपच्या पदाधिकाऱ्यावर बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी हल्ला चढविल्याचे प्रकरण चांगलेच तापले आहे. अशातच आता दिव्यात आयोजित करण्यात आलेल्या दिवा महोत्सवाप्रसंगी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केलेल्या भाषणाचा दिवा भाजपाने चांगलाच समाचार घेतल्याचे दिसत आहे. म्हस्के यांच्या भाषणात दिव्याचा विकास हा झपाटय़ाने होत आहे, सगळ्याच गोष्टी ताबडतोब होत नाहीत, आम्हाला सुध्दा दिव्याचे सिंगापुर बनावयाचे आहे. लोकांची संख्या वाढत आहेत.

- Advertisement -

त्यानुसार रस्ते, पाणी आदी समस्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. दिव्यासाठी क्लस्टर योजना मंजुर करुन घेतली असून त्यामुळे दिव्याचा कायापालाट होणार आहे, असे प्रमुख मुद्दे त्यांनी मांडले आहेत. मात्र त्याचे मीम्स तयार करुन दिव्याचा विकास झाला आहे का?, रस्ते, पायवाटा, पाणी आदींसह इतर समस्या सुटल्या आहेत का? असे आशयाचे व्हिडीओ म्हस्के यांच्या भाषणात जोडून दिवा भाजपचे पदाधिकारी रोहिदास मुंडे यांनी ते वायरल केले आहेत. तसेच नरेश म्हस्के यांचे डोके फिरले आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. दिव्याचे सिंगापुर करु असे म्हस्के म्हणाले. मात्र डम्पींगच्या धुराची नशा त्यांच्या नाकात गेली असेल आणि त्यातूनच त्यांनी हे वक्तव्य केल्याचा टोला त्यांना लगावला आहे.
परंतु आता मुंडे यांच्या या वक्तव्याचा माजी उपमहापौर तसेच दिव्याचे माजी नगरसेवक रमाकांत मढवी यांनी देखील समाचार घेतला आहे. चांगल्या कामांना खो घालण्याचेच हे उद्योग असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. आम्ही सहनशक्ती सोडलेली नाही, आम्ही आजही आमच्या पातळीत आहोत, मात्र पातळी सोडण्याची वेळ येऊ देऊ नका अन्यथा जशाच तसे उत्तर दिले जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -