कोरोना व्हायरस हवेत असा पसरतो, अमेरिकेतील संशोधकांचा दावा

कोरोना व्हायरस २७ फुटांपर्यंत लोकांना संक्रमित करू शकतो.

कोरोना व्हायरस हा हवेमध्ये पसरत नाही, असे तर्क वितर्क मांडले जात होते. परंतु, अमेरिकेतील मॅसाच्युसेटस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या संशोधकांचा रिसर्च नुसार कोरोनाचा हवेशी असलेला संबंध स्पष्ट झाला आहे. कोरोना व्हायरस २७ फुटांपर्यंत लोकांना संक्रमित करू शकतो. अमेरिकी संशोधकांनी केलेल्या रिसर्चनुसार जेव्हा एखादा कोरोनाग्रस्त शिंकतो किंवा खोकतो. त्याच्या तोंडातून निघणाऱ्या लाळेतून कोरोना व्हायरस बाहेर येतो. हा विषाणू हवेत २७ फुटांपर्यंत पसरू शकतो, आणि यात येणाऱ्या एखाद्या व्यक्तीला संक्रमित करू शकतो. हे संशोधन अमेरिकेतील मॅसाच्युसेटस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) च्या संशोधकांनी केला आहे.

मॅसाच्युसेटस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे असोसिएट प्रोफेसर लायडिया बॉउरोइबा यांनी सांगितल्या नुसार, सोशल डिस्टेसिंगला वाढवून दोन फूट करण्याची गरज आहे. जर्नल ऑफ अमेरिकन मेडिकल असोसिएशनमध्ये प्रकाशित शोधानुसार, सर्जिकल मास्क अँड एन-95 मास्कमुळे या विषाणूपासून कितपत आपला बचाव करू शकतो, यावर संशोधन करण्याची गरज आहे.

वातावरणातील आद्रता व तापमान वाढल्यावर व्हायरसचे संक्रमण थांबते

संशोधकांनी सांगितल्या प्रमाणे, वातावरणातील आद्रता किंवा तापमान वाढल्यानंतर व्हायरसचे संक्रमण थांबू शकते. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अँलर्जी अँड इन्फेक्शयस डिसीजचे डायरेक्टर डॉ. एथनी फौजीने एमआयटीच्या संशोधकांच्या रिसर्चवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणतात की, सर्वच ठिकाणी असे होऊ शकत नाही. ज्या ठिकाणी लोक जास्त शिंकत आहेत किंवा खोकलत आहेत, त्याच ठिकाणी व्हायरस पसरण्याची जास्त शक्यता आहे.

शिंकल्यावर किंवा खोकल्यावर ३ हजारापेक्षा जास्त कण हवेत पसरतात

कोरोना व्हायरस संक्रमित व्यक्तीने शिंकल्यावर किंवा खोकल्यावर त्यांच्या लाळेतून कण बाहेर पडतात. या कणामधूनच संक्रमण पसरते. एकदा शिंकल्यावर तोंडातून 3 हजारापेक्षा जास्त कण निघतात.