घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रशिवपुत्र संभाजी महानाटयातून उलगडला स्वराज्याचा धगधगता इतिहास

शिवपुत्र संभाजी महानाटयातून उलगडला स्वराज्याचा धगधगता इतिहास

Subscribe

नाशिक : शिवपुत्र संभाजी या महानाटयाच्या ऐतिहासिक नाटकातील संभाजींच्या राज्याभिषेकाचा देखावा रंगमंचावर साकार होताच संपूर्ण परिसर टाळ्यांच्या कडकडाटात दुमदुमून गेला. दिवाळीच वाटली. चंद्र-तार्‍यांच्या मधोमध आकाशात फटाक्यांचा प्रकाश दिसत होता. जगदंब क्रिएशन प्रस्तुत ऐतिहासिक महानाट्य शिवपुत्र संभाजीचे आयोजन करण्यात आले आहे. नाटकाच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांमध्ये मोठा उत्साह होता. संभाजींच्या जन्मापासून ते महानाट्यममधील त्यांच्या राज्याभिषेकापर्यंतचे प्रत्येक दृश्य प्रेक्षकांना सुखावणारे आहे. महानाट्यातील मराठे आणि मुघल यांच्यातील तलवारबाजीचे दृश्यही रोमांच उभे करणारे होते. डॉ.अमोल कोल्हे यांना संभाजीच्या भूमिकेतील एन्ट्रीने प्रेक्षकांनी टाळयांच्या गजरात दाद दिली.

शिवशंभू शाहीर महेंद्र महाडिक लिखित, दिग्दर्शित या महानाट्यात संभाजींच्या भूमिकेत डॉ. अमोल कोल्हे आहे. रवी पटवर्धन औरंगजेबाची भूमिका साकारत आहे. २१ ते २६ जानेवारी दरम्यान या नाटयाचे आयोजन करण्यात आले आहे. चिन्मय सत्यजीत यांनी या नाटकाला संगीत दिले असून गीत अ‍ॅड. महेंद्र महाडिक, दत्तात्रय सोनवणे, रोहित पंडित यांनी लिहिले आहे. तब्बल पंधरा वर्षांनी नाशिककरांच्या भेटीला आलेले हे महानाट्य असून, भावी पिढीला छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास कळवा यासाठी या महानाटयाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवशंभूची प्रेरणा समस्त लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी हे महानाटयाचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मापासून ते त्यांच्या बलिदानापर्यंतची अंगारगाथा या अडीच तासांच्या महानाटयामध्ये मांडण्यात आली आहे.

- Advertisement -
यांच्या आहेत भूमिका

डॉ. अमोल कोल्हे या महानाटयामध्ये छत्रपती संभाजी महाराज भूमिका साकारत असून ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक हे बादशाह औरंगजेबाच्या भूमिकेत आहेत. यासोबतच स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत महाराणी येसूबाई ची भूमिका साकारणारया प्राजक्ता गायकवाड या महानाटयातही येसूबाईची भूमिका साकारत आहेत. सोबत अनाजी पंतांच्या भूमिकेत महेश कोकाटे, सरसेनापती हंबीररावांच्या भूमिकेत रमेश रोकडे, कवीकलशांच्या भूमिकेत अजय तपकिरे आणि दिलेरखान व मुकर्रबखानच्या दुहेरी भूमिकेत विश्वजीत फडते यांनी दमदार अभिनय साकारला आहे.

भव्य देखाव्याने वेधले लक्ष

महानाट्यासाठी तपोवनातील स्व.बाबूशेठ केला मैदानावर १३० फुटांचा भव्य रंगमंच उभारण्यात आला आहे. ८० फूट लांब व ५५ फूट उंच किल्ल्याची सरकती व फिरती हुबेहुब प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. हत्ती, घोडे, उंट, बैलबंडी या नाटकात पाहायला मिळणार आहे. मराठे व मुघलांच्या तलवारीच्या खणखणात आणि तोफांच्या गडगडात व अग्नीबाणांच्या वर्षावात घनघोर रणसंग्राम, छत्रपती संभाजी महाराज आणि अनाजी पंतांची जुगलबंदी, थेट प्रेक्षकांमधून केली जाणारी गनिमी काव्याने बर्‍हाणपूर मोहीम, जिवंत तोफा पालखी व रोज्यभिषेक सोहळा, १८ फूट जहाजाचा वापरकरून रोमांच उभे करणारी शंभूछत्रपतींची किल्ले जंजिरा मोहीम प्रेक्षकांनी अनुभवली.

- Advertisement -
अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड

महानाटयाच्या सादरीकरणात एलईडी स्क्रीन, इलेक्ट्रिकल आतषबाजी, अत्याधुनिक लाईटसच्या माध्यमातून देखावा साकारण्यात आला आहे. जंजिरा मोहिमेच्या प्रसंगात २० फुटांचे जहाज रंगभूमीवर येते त्यावेळी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समुद्राचा अनोखा इफेक्ट पाहायला मिळाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -