घरमहाराष्ट्रआघाडीचा किमान समान कार्यक्रम जाहीर

आघाडीचा किमान समान कार्यक्रम जाहीर

Subscribe

महाराष्ट्र विकास आघाडीने गुरुवारी आपला किमान समान कार्यक्रम जाहीर केला. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या आघाडीच्या घटक पक्षांनी संयुक्तपणे घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. किमान समान कार्यक्रमात शेतकरी, शेतमजूर, कामगार, व्यापारी, लहान, मोठे उद्योजकांना यांना केंद्रस्थानी मानून हा कार्यक्रम तयार करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

किमान समान कार्यक्रमातील ठळक मुद्दे

अवकाळी पावसामुळे आणि पुरामुळे अडचणीत आलेल्या शेतकर्‍यांना तात्काळ मदत देणार.
शेतकर्‍यांना कर्जमाफी देणार. ज्या शेतकर्‍यांचे नुकसान झाले त्या सर्व शेतकर्‍यांना पिकविमा मिळावा यासाठी पिक विमा योजनेची पुनर्रचना करणार.
शेतकर्‍यांच्या शेतमालास योग्य भाव मिळवण्यासाठी उपाययोजना करणार.
सातत्याने दुष्काळग्रस्त होणार्‍या तालुक्यांना पाणी पोहचवणारी यंत्रणा उभारण्यासाठी भरीव तरतूद करणार.
राज्यातील सर्व रिक्तपदे त्वरीत भरण्यासाठी प्रक्रिया सुरू
सुशिक्षित बेरोजगार युवकांना फेलोशिप उपलब्ध करून देणार.
नोकर्‍यांमध्ये ८० टक्के भूमीपुत्रांना संधीसाठी कायदा करणार.
उच्च शिक्षणासाठी शून्य टक्के व्याजदर कर्ज योजना.
महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणार.
मुंबईसह राज्यात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाअंर्गत ३०० चौरस फुटांऐवजी ५०० चौरस फूट चटई क्षेत्र असलेल्या सदनिका.
आर्थिक दुर्बल कुटुंबातील मुलींचे महाविद्यालयीन शिक्षण विनामूल्य करणार. नोकरी करणार्‍या महिलांसाठी वसतीगृहे.
अंगणवाडी सेविकांच्या मानधनात आणि सुविधेत वाढ.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या धर्तीवर शहरात सडक योजना.

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस यांची टीका
नव्या सरकारचा शपथविधी पार पडल्यानंतर मावळते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्या सरकारवर टीकास्त्र सोडले. महाराष्ट्र विकास आघाडीतर्फे जाहीर केेलेल्या किमान समान कार्यक्रमावर फडणवीस यांनी जोरदार टीकास्त्र सोडले. फडणवीस यांनी यावेळी ठाकरे यांच्यासाठी अभिनंदनाचे ट्विट केल्यानंतर दुसरे ट्विट थेट टीका करणारे करून सर्वांचे लक्ष वेधले देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात वारेमाप घोषणा असल्या तरी मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या विकासाच्या वाटचालीत वर्षानुवर्षे मागे राहिलेल्या क्षेत्राचा साधा नामोल्लेखसुद्धा असू नये, हे दुर्दैवी आहे. नवे सरकार त्याकडे लक्ष देईल, अशी आशा करू या!a

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -