घरताज्या घडामोडीया सरकारचा जीव खोक्यात; मंत्रालयातील आत्महत्येच्या घटनेवरून राऊतांचा संताप

या सरकारचा जीव खोक्यात; मंत्रालयातील आत्महत्येच्या घटनेवरून राऊतांचा संताप

Subscribe

मुंबईतील मंत्रालय परिसरात एकाच दिवशी तीन जणांनी वेगवेगळ्या कारणांवरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेवरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.

मुंबईतील मंत्रालय परिसरात एकाच दिवशी तीन जणांनी वेगवेगळ्या कारणांवरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेवरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. ‘मंत्री भेटत नाहीत. मंत्रालयात किंवा बाहेर सरकारचे अस्तित्व जाणवत नाही, त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाला या सरकारला नपुंसक, नामर्द आणि अस्तित्वशून्य सरकार म्हणावे लागले’, अशा शब्दांत संजय राऊतांनी सरकारवर निशाणा साधला. (The life of this government in the box MP Sanjay Raut anger over suicide incident in Mantralaya)

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गुरूवारी सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी राऊतांनी सरकारवर हल्लाबोल केला. “मंत्री भेटत नाहीत. मंत्रालयात किंवा बाहेर सरकारचे अस्तित्व जाणवत नाही, त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाला या सरकारला नपुंसक, नामर्द आणि अस्तित्वशून्य सरकार म्हणावे लागले. आम्ही नेहमी म्हणतंच आलोय की, हे खोके सरकार आहे. या सरकारचा जीव खोक्यात आहे. ज्या सरकारचा जीव खोक्यात आणि पेट्यांमध्ये असतो. ते सरकार नपुंसक असते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयानेही बरोबर तोच मुद्दा उचलला आहे. सत्यमेव जयते यालाच म्हणतात”, असे संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

“दरवाजे महाराष्ट्रातून नेत आहात, हे लाकूड काही भाजपाच्या मालकीचे नाही. चंद्रपुरात भाजपाने स्वत:च्या अंगणात झाडं लावली आणि घेऊन चाललेत, असे नाही. ही महाराष्ट्राची संपत्ती आहे. महाराष्ट्राचे योगदान अयोध्येतील लढ्यामध्ये कायम आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे या राममंदिराच्या लढ्यात योगदान आहे. महाराष्ट्रातून तुम्ही सागवान लाकूड घेऊन जात आहात, पण तिथे हातोडा मारण्याचे काम आम्हीच केले होते”, असेही संजय राऊत म्हणाले.


हेही वाचा – सर्वोच्च न्यायालयाने एकच हातोडा मारला आणि…, शिंद-फडणवीसांवर संजय राऊतांचा हल्लाबोल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -