घरमहाराष्ट्रतरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करून हत्या

तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करून हत्या

Subscribe

पद्मावती येथील वीर लहुजी सोसायटीमध्ये पत्नीला शिवीगाळ का करतो, या कारणावरून झालेल्या वादात तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करून त्याची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मोहन गायकवाड (28) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल केला असून, एकाला अटक केली. तुळशीराम पाटोळे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, राकेश पाटोळे आणि गणेश वैराट यांचा शोध सुरू आहे.

आरोपी आणि मोहन गायकवाड काही दिवसांपूर्वी कोल्हापूरला एकत्र गेले होते. तेथे त्यांच्यात काही वाद झाला होता. त्यानंतर ते बुधवारी सकाळी परत आले. त्यानंतर संध्याकाळी मोहन गायकवाड हा सोसायटीत उभा असताना आरोपी त्या ठिकाणी आले आणि आरोपी राकेश पाटोळे याने माझ्या बायकोला शिवीगाळ का केली? असा जाब विचारला.

- Advertisement -

यावरून त्यांच्यात परत भांडण झाले. तिघांनी मिळून मोहन गायकवाड याला बेदम मारहाण केली तर एकाने त्याच्या डोक्यात लोखंडी रॉड घातला आणि तिघेही पळून गेले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मोहनला नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले, परंतु तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -