घरताज्या घडामोडीतपासणीचा विलंब टळणार; कस्तुरबा लॅबची क्षमता दुपट्टीने वाढणार - राजेश टोपे

तपासणीचा विलंब टळणार; कस्तुरबा लॅबची क्षमता दुपट्टीने वाढणार – राजेश टोपे

Subscribe

नागरिकांनी घाबरून जाऊ नये, पण काळजी घ्यावी, असे आवाहन राजेश टोपे यांनी केले आहे.

मुंबईतील करोना पॉझिटीव्ह रुग्णांची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. संपुर्ण परिस्थितीचा आढावा घेत आरोग्यमंत्र्यानी मुंबईत आढळणाऱ्या रुग्णांसाठी विशेष सुविधा केल्या गेल्या असल्याचं सांगितलं आहे.

कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांच्या तपासणीसाठी विलंब होऊ नये, यासाठी कस्तुरबा लॅबची क्षमता वाढवणार असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. सध्या कस्तुरबा विलगीकरण कक्षात ८० बेड्सची क्षमता आहे. ती वाढवून १०० बेड्सची सुविधा करण्यात येणार आहे. त्याचबरोबर इथे जे संशयित रुग्ण आहेत त्यांची काळजी घेण्याच्या दृष्टीकोनातून त्यांना योग्य जेवण, वायफाय, पेपर्स, टिव्ही अशा छोट्या छोट्या गोष्टींचीही सुविधा देण्यात येत आहे. कस्तुरबाच्या लॅबमध्ये सध्या १०० तपासण्या दर दिवशी केल्या जातात. आता या लॅबची क्षमता दुप्पट होऊन म्हणजेच नवीन आरटीपीसीआर मशीन आणून दिवसाला २५० तपासण्या केल्या जातील यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तसंच, प्रत्येक शिफ्टनुसार ५० तपासण्या केल्या जातील एवढी क्षमता या लॅबमधील मशीनची सुविधा वाढवली जाणार आहेत. पुढच्या दोन दिवसांत बुधवारपासून या लॅबची क्षमता वाढणार आहे. यातून ३५० तपासण्या दिवसाला केली जातील अशी क्षमता वाढवली जाणार आहे. या तपासण्यांसाठी लागणाऱ्या किट्स ही मुबलक प्रमाणात असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं असून या किट्सचा पुरवठा एनआयव्ही पुणेकडून करण्यात येत आहे.

- Advertisement -

जेजेत ही लॅबची सुविधा 

या व्यतिरिक्त १५ ते २० दिवसांच्या आत जेजे, हाफकिन आणि बी. जे. पुणे याठिकाणी सुद्धा नवीन लॅब सुविधा तयार केली जाणार आहे. इथे लागणारी यंत्रसामुग्री, नवीन मशीन, मनुष्यबळ, डॉक्टरांना प्रशिक्षण हे सर्व १५ ते २० दिवसांच्या आत केलं जाणार आहे. या संदर्भातील सर्व निर्णय झाले असून लवकरच ऑर्डर्स दोन दिवसांत दिल्या जातील.

जिथे जिथे गरज भासेल तिथे लॅबची सुविधा देणार

करोनाच्या रुग्णांच्या तपासणीसाठी जिथे जिथे गरज भासेल तिथे तिथे लॅबची सुविधा सुरू केल्या जाणार आहेत. मिरज, सोलापूर, धुळे, औरंगाबाद जिथे वैद्यकीय कॉलेजेस आहेत तिथे अशा संदर्भात लॅब उभारण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी जी परवानगी प्रक्रिया लागणार आहे ती देखील पूर्ण झाली असून तपासण्यांसाठी होणारा विलंब या अनुषंगाने टाळता येण्यास मदत होईल, तसंच विलगीकरण बेड्सची सुविधा देखील दिली जाणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.

- Advertisement -

दर दिवशी ३५० रुग्णांची ओपीडी

कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये सध्या करोना तपासणीसाठी दररोज ३५० ची ओपीडी आहे. या ओपीडीला नियंत्रण करण्यासाठी पोलीस बंदोबस्त दिला जाणार आहे. रुग्ण, त्यांचे नातेवाईक, संशयित अशा सर्वांची काळजी घेतली जात आहे. जे डॉक्टर्स इथे रुग्णांवर उपचार करत आहेत त्यांच्यासाठी ४ हजारांहून अधिक पीपीई किट्स देखील पुरवले गेले आहेत. ४ हजारांहून अधिक एन ९५ मास्कचा साठा इथे देण्यात आला आहे.

सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये क्वारंटाईनची व्यवस्था

सरकारच्या नियमावलीनुसार, ७ देशांमधून येणाऱ्या पर्यटकांना क्वारंटाईन करण्याची व्यवस्था केली गेली आहे. जुन्या सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये ४०० बेड्सची क्वारांटाईनसाठी व्यवस्था केली आहे. अजून चार ते पाच दिवसांत अन्य ५०० बेड्सची सुविधा सुरू केली जाणार आहे. त्यामुळे किमान हजार बेड्स क्वारंटाईनसाठी देण्यात येतील.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ” सध्या राज्यात ३३ करोना पॉझिटिव्ह रुग्ण असून मुंबईच्या कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये ९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ८० संशयित रूग्ण इथे आहेत. निश्चितच संख्या वाढलेली आहे. पण, रोगप्रतिकार शक्ती चांगली असेल तर व्हायरस आजार बरे करता येतात. त्यामुळे, कोणीही घाबरुन जाऊ नये, वारंवार हात स्वच्छ धुणे या सर्व पाळल्या गेल्या पाहिजे. संसर्ग पसरु नये यासाठी अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. ”

३० तारखेनंतर एमपीएससीच्या होणार परीक्षा

राज्यात संशयित करोना रुग्ण आढल्यामु्ळे भीतीचे वातावरण मोठ्या प्रमाणात पसरू लागले आहे. राज्यामध्ये करोना बाधित ३२ रूग्ण सापडले आहेत. राज्य सरकारकडून सर्व स्तरावर करोना विषाणूबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी मुंबईतील कस्तुरबा गांधी रुग्णालयात जाऊन करोना रुग्णांचा आढावा घेतला. त्यावेळी टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाध साधला. यावेळी एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्याच्या सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. याशिवाय, एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्याच्या म्हणेजच या परीक्षा ३० तारखेनंतर घेण्याच्या सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहेत. तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये, पण काळजी घ्यावी, असे आवाहन राजेश टोपे यांनी केले आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -