‘द केरला स्टोरी’ची कथा रामदास स्वामींनी शेकडो वर्षांपूर्वीच लिहिली? ‘या’ अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल

माझ्या हाती रामदास स्वामी यांच्या अस्मानी सुलतानी मधील चार ओळी लागल्या आहेत. मी तर म्हणतो द केरळ स्टोरीची वन लाइन कथा शेकडो वर्षांपूर्वी समर्थ रामदास स्वामींनी लिहून ठेवली आहे.

The story of The Kerala Story was written by Ramdas Swami hundreds of years ago The video of Yogesh Soman actor is viral
The story of The Kerala Story was written by Ramdas Swami hundreds of years ago The video of Yogesh Soman actor is viral

द केरला स्टोरी या चित्रपटावरुन देशभरात गदारोळ सुरु झाला आहे. काहींनी या चित्रपटावर आक्षेप घेतला आहे तर काहींनी या चित्रपटाचं समर्थन केलं आहे. द केरला स्टोरी हा चित्रपट केरळ राज्याविरोधातील प्रोपगंडा असल्याचंही अनेकांनी म्हटलं आहे. एवढचं नव्हे तर द केरला स्टोरी चित्रपटातील दावा सिद्ध करणाऱ्याला एक कोटी रुपयांचे बक्षिस देऊ असा दावा केरळातल्या एका मुस्लिम संघटनेनं केला आहे. ( The story of The Kerala Story was written by Ramdas Swami hundreds of years ago The video of Yogesh Soman actor is viral )

देशभरात या चित्रपटावरुन वाद सुरु असताना, आता अभिनेते योगेश सोमण यांनी एक दावा केला आहे. योगेश सोमण म्हणाले की, या सिनेमाचा थेट संबंध रामदास स्वामींशी आहे. अभिनेत्याचा व्हिडिओ फेसबुक तसंच युट्युबवर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यांनी समर्थ रामदास स्वामींच्या अस्मानी सुलतानी श्लोकामधील चार ओळी सांगितल्या आहेत.

काय म्हणाले साोमण? 

संबंधित व्हिडिओत सोमण म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी द केरला स्टोरी नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला. यानंतर इंटरनेट आणि इतर माध्यमातून या चित्रपटावरुन गदारोळ झाला. काहीजणांनी या चित्रपटांचं गांभीर्य लोकांना सांगितलं. तर काही जणांनी चित्रपटाची सत्य आणि असत्यता याबाबत आपले विचार मांडले. पण अचानक माझ्या हाती रामदास स्वामी यांच्या अस्मानी सुलतानी मधील चार ओळी लागल्या आहेत. मी तर म्हणतो द केरळ स्टोरीची वन लाइन कथा शेकडो वर्षांपूर्वी समर्थ रामदास स्वामींनी लिहून ठेवली आहे.

किती गुजरीणी ब्राम्हणी भ्रष्टविल्या
किती शांबूखी जहाजी फाकविल्या
किती एक देशांतरी त्या विकिल्या
किती सुंदरा हाल होवोनि मेल्या

रामदास स्वामी यांच्या अस्मानी सुलतानी मधील श्लोकाच्या या चार ओळी द केला स्टोरीची संपूर्ण कथा सांगतात. शांबूखी शब्दाचा अर्थ सांगताना सोमण म्हणाले, शांबूखी हा शब्द शहामुखी या शब्दाचा अपभ्रंश आहे, तर फाकविल्या म्हणजे पाठवल्या, त्यांनी असं म्हटलं की या चार ओळींमध्ये रामदास स्वामींनी द केरला स्टोरीची वन लाइन कथा शेकडो वर्षांपूर्वी लिहून ठेवली आहे. योगेश यांनी ट्वीरवर हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सोमण यांचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे.

( हेही वाचा: मनोज वाजपेयीच्या चित्रपटावर बंदीची मागणी, आसाराम बापूंच्या जीवनावर आधारित सिनेमा )