घरताज्या घडामोडीVaccination for 15-18 age group: नाशकात लसीकरण मोहिमेत गोंधळ, विद्यार्थ्यास कोव्हॅक्सिनऐवजी दिली...

Vaccination for 15-18 age group: नाशकात लसीकरण मोहिमेत गोंधळ, विद्यार्थ्यास कोव्हॅक्सिनऐवजी दिली कोविशिल्ड

Subscribe

नाशिक जिल्ह्यात सोमवारपासून १५ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांचे कोरोना लसीकरण सुरू करण्यात आले. मात्र, या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी येवला येथील लसीकरण केंद्रावर गोंधळ उडाला. या ठिकाणी विद्यार्थ्याला कोव्हॅक्सिनऐवजी चक्क कोविशिल्ड लस देण्यात आली. त्यामुळे पालक संतप्त झाले असून, कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

 कोविशिल्ड लस दिल्याचा धक्कादायक प्रकार

कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन या नवीन प्रकाराने रुग्णसंख्येतही वाढ होत आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकार आता दक्ष झाले आहेत. कोरोना विषाणूचे संक्रमण वाढू नये, म्हणून आजपासून सर्वत्र १५ ते १८ वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलांचे लसीकरण सुरू झाले. शासनाने या मुलांना कोव्हॅक्सिन ही लस देण्याचे सांगितले आहे. मात्र, येवला तालुक्यातील पाटोदा प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये १६ वर्षे वयाच्या अथर्व पवार यास कोव्हॅक्सिनऐवजी कोविशिल्ड लस दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तालुक्यातील आरोग्य विभागाच्या या भोंगळ कारभाराने पालक धास्तावले आहेत.

- Advertisement -

या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशी करण्याची मागणी अथर्वचे वडील वसंत पवार यांनी केली आहे. दुसरीकडे आरोग्य केंद्रांमध्ये असलेल्या आरोग्य सेविकेने चुकून हा प्रकार केल्याची कबुली तालुका आरोग्य अधिकारी हर्षल नेहते यांनी दिली आहे. मात्र, संबंधितांवर काय कारवाई करणार याबाबत त्यांनी मौन बाळगले. शिवाय मी चौकशीसाठी आल्याचे सांगून वेळ मारून नेली. दरम्यान, सध्या लसीकरण झालेल्या अथर्वची तब्येत व्यवस्थित आहे.


हेही वाचा : Corona positive : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार कोरोना पॉझिटिव्ह

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -