Eco friendly bappa Competition
घर उत्तर महाराष्ट्र ठाकरे गटाला पुन्हा नाशकात धक्का; शिवसेना महिला आघाडी शिंदे गटाच्या वाटेवर

ठाकरे गटाला पुन्हा नाशकात धक्का; शिवसेना महिला आघाडी शिंदे गटाच्या वाटेवर

Subscribe

नाशिक : उद्धव ठाकरे यांची आज मालेगाव येथे जाहीर सभा होत असतानाच ठाकरे गटाला नाशिकमध्ये एक मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या महिला आघाडी मधील प्रमुख महिला पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

नाशिक ठाकरे गटाच्या महिला आघाडीने शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून सकाळी दहा वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा प्रवेश सोहळा पार पडणार असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

- Advertisement -

गेल्या अनेक दिवसांपासून शिंदे गटाने नाशिकवर लक्ष केंद्रित केले असून प्रत्येक वेळी संजय राऊत यांच्या दौऱ्या दरम्यान ठाकरे गटाला धक्का देण्याचे तंत्र शिंदे गटाकडून अवलंबून जात आहे. मात्र, आज खुद्द ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आज मालेगाव येथे अद्वहिरे यांच्या प्रवेश सोहळ्याच्या निमित्ताने नाशिक दौऱ्यावर असून या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून ठाकरे गटाला एक मोठा धक्का देण्यात आला आहे.

महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शोभा मगर, मंगला भास्कर, शामला दीक्षित आदींसह संपूर्ण महिला आघाडी शिंदे गटाच्या वाटेवर आहे स्थानिक नेतृत्वाकडून महिलांना मिळत असलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळेच आपण हा निर्णय घेतला असल्याचे महिला पदाधिकाऱ्यांनी सांगितले

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -