घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रशिंदे गटाच्या महिला पदाधिकारी एकमेकांना भिडल्या; थेट पोलीस ठाण्यातच राडा

शिंदे गटाच्या महिला पदाधिकारी एकमेकांना भिडल्या; थेट पोलीस ठाण्यातच राडा

Subscribe

नाशिक : शिवसेना शिंदे गटाच्या नाशिक महिला कार्यकारिणीतील मतभेद उघड्यावर आले आहेत. शनिवारी (दि. १०) शिंदे गटाच्या महिला आघाडीतील पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा राडा झाला. मुंबई नाका पोलीस ठाण्यातच शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाध्यक्ष लक्ष्मी ताठे आणि शोभा मगर यांच्यात राडा झाल्याने नाशिक मधील शिवसेनेच्या शिंदे गटाच्या महिला आघाडीत सुरू असलेला  सुप्त संघर्ष चव्हाट्यावर आला आहे.

नाशिक शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह याठिकाणी आयोजित करण्यात आली होती. याठिकाणी महिला आघाडीच्या लक्ष्मी ताठे आणि शोभा मगर यांच्यामध्ये शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या समोरच पक्षातील पदांच्या नियुक्तीवरून शाब्दिक चकमक झाली.  याच बाबत लक्ष्मी ताठे या शोभा मगर यांच्या विरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी गेल्या होत्या, मात्र याचवेळी शोभा मगर आणि त्यांचे चिरंजीव धीरज मगर आपल्या काही समर्थकांसह थेट पोलीस स्टेठाण्यात शिरले आणि त्याठिकाणी मगर आणि ताठे यांच्या गटात जोरदार राडा झाला.

- Advertisement -

दरम्यान याप्रकरणी मुंबई नाका पोलीस स्टेशनमध्ये लक्ष्मी ताठे यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार दाखल केली आहे. तर शोभा मगर यांनी हे सर्व आरोप धुडकावून लावले आहे. एका बाजूला भाऊसाहेब चौधरी शिवसेना शिंदे गटाच्या संघटन मजबुतीसाठी काम करत असताना अशा पद्धतीने पक्षाअंतर्गत वाद होणे आणि थेट पोलीस ठाण्यामध्ये हमरी तुमरी  पर्यंत हे प्रकरण जाणे ही नक्कीच शिवसेना शिंदे गटाचे टेन्शन वाढवणारे ठरणार असल्याचे समोर येते.

 मी काहीही बोललेली नाही माझा काहीच संबंध नाही कार्यालयात घटना घडली आहे त्या मुळे मी काय बोलले काय नाही सगळ्यांना माहिती आहे. वाद पदावरूनच झालेला आहे. मी कोणालाच शिवीगाळ केलेला नाही. : शोभा मगर 

शोभा मगर यांचा मुलगा धीरज मगर आणि साथीदारांनी माझ्यावर पोलिस स्टेशन मध्ये हल्ला केला, पक्षा मध्ये हे हुकुमशाही गाजवतात, जातीयवाद करतात या सगळ्यावर शासन नाही झाल, मला न्याय नाही मिळाला तर मी उपोषणाला बसेन. : लक्षी ताठे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -