घरताज्या घडामोडीCoronavirus: राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कामकाज सुरू राहणार

Coronavirus: राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कामकाज सुरू राहणार

Subscribe

शेतमालाचा समावेश जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत होतो. त्यामुळे बाजार समित्यांचे कामकाज बंद ठेवणे उचित होणार नसल्याचं बाळासाहेब पाटील म्हणाले.

अन्नधान्य, भाजीपाला, फळे, कडधान्ये आदी शेतमालाचा समावेश जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत असून त्याचा ग्रहकांना सुरक्षित पुरवठा व्हावा म्हणून राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कामकाज सुरू राहणार असल्याची माहिती पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी शुक्रवारी दिली. कृषी उत्पन्न समितीच्या आवारात फळे, भाजीपाला बाजाराचे कामकाज सकाळी लवकर संपते. हा बाजार संपल्यानंतर बाजार समित्यांची साफसफाई आणि निर्जंतुकीकरण करण्याची सूचना देण्यात आल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले.

करोना विषाणूच्या प्रदूर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात दैनंदिन जनजीवनावर अंशत: निर्बंध घालण्यात आले आहेत. करोनाचा फैलाव होऊ नये म्हणून काही ठिकाणी बाजार समित्यांमध्ये बंद पाळला जात आहे. या बंदमुळे शेतकरी आणि ग्राहकांची कोंडी होत आहे. यासंदर्भात पणन संचालकांनी बाजार समितीच्या प्रशासनाला समित्या सुरू ठेवण्याचे निर्देश देऊनही बाजार समितीत व्यापाऱ्यांच्या स्तरावर बंद पाळला जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Coronavirus: पुण्यात अघोषित संचारबंदी; परप्रांतीयांची गावाकडे धाव


यापार्श्वभूमीवर बोलताना बाळासाहेब पाटील यांनी राज्यात करोनाचे संकट असले तरी बाजार समित्यांचे कामकाज बंद ठेवणे उचित होणार नसल्याचे सांगितले. शेतमालाचा समावेश जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत होतो. करोनाची साथ असली तरी जनतेला भाजीपाला, अन्नधान्य मिळणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कुठेही बाजार समित्यांचे कामकाज बंद राहील असे म्हटलेले नाही. त्यामुळे बाजार समित्यांचे काम नियमितपणे सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्याचे पाटील म्हणाले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -