घरमहाराष्ट्रकुर्बानीवर बंदी नाही

कुर्बानीवर बंदी नाही

Subscribe

ईदसाठी शरद पवारांनी बोलावली सर्वपक्षीय मुस्लीम नेत्यांची बैठक

येत्या १ ऑगस्ट रोजी असणार्‍या बकरी ईदनिमित्त कुर्बानी देण्यावरून सर्वपक्षीय मुस्लीम नेत्यांमधील मतभेद दूर करण्यासाठी राष्ट्रवादीचे पक्षप्रमुख शरद पवार यांनी मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे मंगळवारी बैठक घेतली. या बैठकीला समाजवादी पक्षाचे अबू आझमी,रईस शेख काँग्रेसचे नसीम खान, काँग्रेसचे अमिन पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आणि इतर नेते उपस्थित होते. बकरी ईदला कुर्बानीवर राज्य सरकारने बंदी घातलेली नाही, असे नवाब मलिक यांनी बैठकीनंतर सांगितले.

बकरी ईद अवघ्या ४ दिवसांवर आली असून शासनातर्फे स्पष्ट नियमावली न आल्याने मुस्लीम समाजात नाराजी आहे. तर कुर्बानी देण्याला या दिवशी महत्त्व असल्याने सामूहिक कुर्बानीस परवानगी द्यावी, मशिदी खुल्या करण्यात याव्यात अशी मागणी केली जात आहे. ऑनलाइन बकरी खरेदीचा पर्याय देण्यात आला असून ऑनलाइन ऑर्डर केलेल्या नागरिकांना बकरी देण्यात येईल, असे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.

- Advertisement -

या बैठकीत मुस्लीम नेत्यांनी शरद पवार यांच्याकडे आपली बाजू मांडली. त्यानंतर शरद पवार यांनी बैठकीतील नेत्यांना आपली बाजू मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडण्याची सूचना दिली, अशी माहिती समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी यांनी दिली.

बकरी ईद साजरी करण्यासाठी मुस्लिमांना बकर्‍याची कुर्बानी देणे भाग आहे. यावर उपाय केला जाऊ शकतो का? तसेच यावर काय मार्गही काढता येईल का? यासंदर्भात राज्यात बकरी ईद साजरी होण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्वपक्षीय मुस्लीम नेत्यांशी बैठक बोलावली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -