Saturday, June 10, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र मंकीपॉक्सचे एकही प्रकरण महाराष्ट्रात नाही; कुठलेही भय मनात बाळगू नका - राजेश...

मंकीपॉक्सचे एकही प्रकरण महाराष्ट्रात नाही; कुठलेही भय मनात बाळगू नका – राजेश टोपे

Subscribe

मंकीपॉक्सचे एकही प्रकरण महाराष्ट्रात किंवा भारतात नाही. त्यामुळे मंकीपॉक्सचे (Monkey Pox) कुठलेही भय मनात ठेवायचे कारण नाही. खबरदारी म्हणून आपण विमानतळांवर बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची मेडिकल स्क्रिनिंग करत आहोत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांना दिली. जनता दरबार उपक्रमास उपस्थित राहिले असता राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी माध्यमांशी संवाद साधला.

हेही वाचा – मंकीपॉक्स रोगाबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची मार्गदर्शक तत्त्वे जारी

- Advertisement -

राज्यामधील ३६ जिल्ह्यांपैकी मुंबई आणि पुणे इथे कोरोना रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. एकूण साडेतीन हजाराच्या आसपास सक्रिय रूग्ण सध्या राज्यामध्ये आहेत. त्यातील अडीच हजार रूग्ण हे एकट्या मुंबईमध्ये आहेत. रूग्णालयात रूग्ण दाखल होण्याच्या संख्येमध्ये मात्र वाढ दिसत नाही. तसेच रूग्णालयांमध्ये रूग्णांची भर्ती मोठ्या प्रमाणात होत नसल्याने सध्यातरी जम्बो कोविड सेंटरची आवश्यकता नसल्याची माहितीही राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली.

हेही वाचा – Monkeypox : भारतातही मंकीपॉक्सचा धोका वाढला; अशाप्रकारे पसरतोय संसर्ग; ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

- Advertisement -

पावसाळ्यात साथीचे रोग वाढतात कारण पावसाळ्यामध्ये आपल्याला बहुतांश ठिकाणी पाणी साचलेले दिसते. त्या साचलेल्या पाण्यात मच्छरांची पैदास होते. ज्या ठिकाणी स्वच्छ पाणी मिळण्याची शक्यता कमी आहे, तेथील नागरिकांनी पाणी उकळून प्यावे, अशा सूचना आरोग्य विभागातून नेहमीच दिल्या जातात, असेही राजेश टोपे (Rajesh Tope) म्हणाले.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -