घरमहाराष्ट्रलोकायुक्त समितीमध्ये 'या' तिघांची नावं?

लोकायुक्त समितीमध्ये ‘या’ तिघांची नावं?

Subscribe

समितीमध्ये अण्णांच्याकडून ५ सदस्य आणि सरकारकडून ५ सदस्य असणार आहेत. अण्णांच्या समितीमध्ये माधव गोडबोले, उमेशन सारंग आणि विश्वबंर चौधरी यांच्या नावाची चर्चा आहे.

देशात लोकायुक्त आणि लोकपाल व्यवस्थेमध्ये सुधारणा व्हावी म्हणून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सुरु केलेल्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. मात्र सरकारकडून योग्य दखल घेतली न गेल्याने अण्णा उपोषणावर ठाम आहेत. अण्णांची समजूत काढण्यासाठी राज्य आणि केंद्राकडून मंत्री आले मात्र अण्णांनी उपोषण मागे घेतले नाही. त्यामुळे आता मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषीमंत्री अण्णांच्या भेटीला आले आहेत. दरम्यान, अण्णांनी मागणी केलेल्या लोकायुक्त समितीमध्ये सध्या तीन जणांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. या लोकायुक्त समितीमध्ये माधव गोडबोले, उमेशन सारंग आणि विश्वबंर चौधरी यांच्या नावाची चर्चा आहे.

अण्णांच्या समितीत ५ जण 

महाराष्ट्र सरकारने कॅबिनेट मंत्री मंडळाच्या बैठकीमध्ये लोकायुक्ताच्या ड्राफ्टला मंजूरी दिली होती. मात्र लोकायुक्त लागू न झाल्यामुळे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी अण्णांची भेट घेत सरकारचा लोकायुक्ताचा डाफ्ट दाखवला होता. या ड्राफ्टवर अण्णांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर गिरीश महाजन यांनी पुन्हा सुधारीत ड्राफ्ट घेऊन काल अण्णांची भेट घेतली होती. या भेटी दरम्यान, महाजन यांनी अण्णांना समिती स्थापन करण्याचे पत्र दिले होते. काल तीन तास झालेल्या बैठकीमध्ये अण्णांनी लोकायुक्त समितीला आणि ड्राफ्टला मंजूरी दिली होती. या समितीमध्ये अण्णांच्याकडून ५ सदस्य आणि सरकारकडून ५ सदस्य असणार आहेत. अण्णांच्या समितीमध्ये तीन लोकांच्या नावाची चर्चा आहे. ज्यामध्ये माधव गोडबोले, उमेशन सारंग आणि विश्वबंर चौधरी यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे.

- Advertisement -

समितीतील १० जणांची नावं होणार जाहीर

गिरीश महाजन आणि सुभाष भामरे यांनी काल अण्णांची भेट घेतली. त्यांच्यामध्ये जवळपास ३ तास चर्चा झाली. या चर्चे दरम्यान, अण्णांची लोकायुक्त आणि लोकपालाची मागणी मान्य झाली होती. मात्र, अण्णांनी स्वामिनाथन आयोगासंदर्भात केलेली मागणी मान्य न केल्यामुळे अण्णा उपोषणावर ठाम होते. आज मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषी मंत्री यांच्या भेटीमध्ये अण्णांची ही देखील मागणी मान्य होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही वेळातच अण्णा उपोषण सोडू शकतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, लोकायुक्त समितीमध्ये असणाऱ्या सदस्यांची नावांची यादी दुपारनंतर स्पष्ट होणार आहेत.

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -