घरताज्या घडामोडीगोडावूनमधून ११९ टिव्ही, ८ एसी चोरणार्‍या आंतरराज्य टोळीतील चोरटे गजाआड

गोडावूनमधून ११९ टिव्ही, ८ एसी चोरणार्‍या आंतरराज्य टोळीतील चोरटे गजाआड

Subscribe

नाशिक : तिगराणीया कॉर्नर येथील गोदावरी एमआयडीसीमधील मॅट्रिक्स डिस्ट्रीब्युटर्सचे गोडावून फोडून चोरी करणार्‍या आंतरराज्य टोळीतील दोन चोरट्यांना नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून गोध्रा (गुजरात) येथून अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी ११९ एलईडी टिव्ही, ८ एसी व ट्रक जप्त केला. या गुन्ह्यात आणखी चोरटे असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. अश्फाक अब्दुल्ला जबा (दोघेही रा.गोध्रा, जि.पंचमहल), खालीद याकुब चरखा अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

२२ जुलै रोजी भद्रकालीतील तिगराणीरोडवरील मेट्रीक्स डिस्ट्रीब्युटर्स कंपनीचे गोडावून फोडून चोरट्यांनी १३२ एलईडी टिव्ही, ६ एसी व ३० हजार रूपयांची रोकड लंपास केल्याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. घटनास्थळाची पाहणी करत गुन्ह्याचा तपास शहर गुन्हे शाखेच्या युनीट एकने समांतर तपास सुरू केला. चोरटे गुजरातमधील गोध्रा (जि.पंचमहल) येथील असल्याचे माहिती पथकास मिळाला. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. गोध्रा येथील पोलिसांची मदत घेत पोलिसांनी दोनजणांना अटक केली. पोलीस चौकशीत दोघांनी भद्रकालीत गोडावूनमधून चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून एलईडी टिव्ही, एसी, ट्रक जप्त केला.

- Advertisement -

गुन्हे शाखेच्या पथकाला ५० हजारांचे बक्षीस

टिव्ही, एसी चोरी गुन्ह्यात कोणताही घटनास्थळी पुरावा नसताना शहर गुन्हे शाखेच्या युनीट एकने तपास करत संशयित आंतरराज्य टोळीतील दोन चोरट्यांना अटक केली. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ५० हजार रूपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले असल्याचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी सांगितले.

अशी आहे आंतरराज्य चोरट्यांची मोडस ऑपरेंडी

नाशिक शहर पोलिसांनी अटक केलेल्या आंतरराज्य चोरट्यांची गोडावूनमधून टायर्स चोरी करत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. चोरट्यांवर महाराष्ट्र, गुजरात व इतर राज्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. सिन्नर पोलीस ठाणे हद्दीत २१ जुलै रोजी चोरट्यांनी गोडावून फोडून २०९ टायर्सची चोरी केली होती. गुजरातमधील सुरेंद्रनगरमधील पायला पोलीस ठाणे हद्दीतील १८ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास दुकान फोडून २ लाख ८६ हजार रूपयांचे टायर चोरी केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -