घरमहाराष्ट्रनगरचा तिसरा करोनाबाधितही परदेशातील व्यक्तीच्या संपर्कात!

नगरचा तिसरा करोनाबाधितही परदेशातील व्यक्तीच्या संपर्कात!

Subscribe

संबधित संशयित व्यक्तीसह जास्त धोका असलेल्या २३ जणांचे स्त्राव नमुने तपासणीसाठी ताब्यात

नगरमध्ये सापडलेला तिसरा करोनाबाधित रुग्ण हा वैद्यकीय सेवेतील असल्याने आणि त्याने कोणताही प्रवास केलेला नसतांना त्याला करोनाची लागण झाली होती. परदेश प्रवासाचा इतिहास नसलेल्या व्यक्तीला करोनाची लागण झाल्याने प्रशासनासमोरील चिंता वाढली होती, नंतरच्या अधिक तपासणीत हा रुग्णदेखील परदेश प्रवास करुन आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याचे आरोग्य विभागाच्या तपासणीत पुढे आले आहे. त्यामुळे संबधित संशयित व्यक्तीसह जास्त धोका असलेल्या २३ जणांचे स्त्राव नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले. महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी ही माहिती दिली.

नगरमध्ये आत्तापर्यत तीन करोनाबाधित सापडले आहेत. यातील दोघांनी परदेश प्रवास केल्याचे पुढे आले तर तिसऱ्या रुग्णाने परदेश प्रवास न करताच त्याला देखील लागण झाल्याने प्रशासन चिंतेत होते. संबधीत कोणाकोणाच्या संपर्कात आली याबद्दल विचारणा केली जात होती. मात्र त्यातून ठोस माहिती समोर येत नव्हती. अखेरिस परिसरातील लोकांची तपासणी करत असतांना या भागात एक परदेशातून आल्याचे स्पष्ट झाले. या व्यक्तीच्या संपर्कात संबधित रुग्ण आल्याचे समोर आले. संबधित रुग्णाने देखील हे मान्य केले. त्यामुळे आता नव्याने या परदेश प्रवास केलेल्या व्यक्तीचे स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्याच्या अहवालाची प्रतिक्षा प्रशासनाला लागली आहे.


हेही वाचा – क्वारंटाइनचा शिक्का पुसून लेकासह आईने केला रेल्वे प्रवास!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -