घरठाणेठाण्यातून हजारो शिवसैनिक अयोध्येला रवाना ; मुख्यमंत्र्यांनी दाखविला भगवा झेंडा

ठाण्यातून हजारो शिवसैनिक अयोध्येला रवाना ; मुख्यमंत्र्यांनी दाखविला भगवा झेंडा

Subscribe

ठाणे : येत्या ९ एप्रिल रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आयोध्याला रामललाच्या दर्शनाला जाणार आहेत. त्यासाठी चलो अयोध्या असा नारा दिल्याने शुक्रवारी ठाणे रेल्वे स्थानकातून विशेष अयोध्या ट्रेन सोडण्यात आली. त्या ट्रेनला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवला. त्या ट्रेनमधून दीड हजारांहून अधिक जिल्ह्यातील शिवसैनिकांनी जय श्री राम आणि शिवसेनाच्या घोषणा देत अयोध्याकडे कूच केली आहे. यावेळी बोलताना, मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या दौऱ्याने घरात बसणाऱ्यांना बाहेर पडावे लागले. अशी टीकास्त्र त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. तसेच आपल्या दौऱ्यामुळे सर्वच जण कामाला लागले आहेत. तर बाळासाहेब ठाकरे यांचे देखील स्वप्न होते की, आयोध्येत प्रभु रामाचे मंदिर व्हावे आणि ते स्वप्न साकार होत असल्याचेही त्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

ठाणे रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ८ वरून शुक्रवारी दुपारी ४ वाजता अयोध्या येथे विशेष ट्रेन सोडण्यात येणार असल्याने दोन वाजल्यापासून शिवसैनिकांनी स्थानकात ठाण मांडले. दरम्यान हळूहळू जिल्ह्यातून शिवसैनिक दाखल होऊ लागले. डोक्यात भगव्या रंगाची टोपी आणि पांढऱ्या रंगाचा टीशर्ट असा पोषाख परिधान केले शिवसैनिक पाहण्यास मिळत होते. दुपारी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास ट्रेन आली. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवला आणि ट्रेन आयोध्याला रवाना झाली. यावेळी त्यांच्या समेवत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रविंद्र फाटक, बालाजी किणीकर, मिनाक्षी शिंदे आदींसह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

ट्रेनमध्ये ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर या शहरांसह मुंबई रायगड यांच्यासाठी विशेष डब्ब्याची व्यवस्था १६ डब्यांमध्ये केली होती. विशेष म्हणजे रविवारी शिवसेनेच्या पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांवर आपल्या विभागात महाआरती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तदपूर्वी शिवसेनेचे स्थानिक नेते अगोदरच अयोध्येत तळ ठोकून बसले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : जे घरात बसलेत त्यांनाही कामाला लावलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -