घरदेश-विदेशRBI, सरकारचं नातं पती - पत्नीसारखं - डॉ. मनमोहन सिंह

RBI, सरकारचं नातं पती – पत्नीसारखं – डॉ. मनमोहन सिंह

Subscribe

RBI, सरकारचं नातं हे पती - पत्नीसारखं असतं असं माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी म्हटलं आहे. आपण सर्वांनी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्वायतत्तेचा आदर केला पाहिजे असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

RBI, सरकारचं नातं हे पती – पत्नीसारखं असतं असं माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी म्हटलं आहे. आपण सर्वांनी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्वायतत्तेचा आदर केला पाहिजे असं देखील त्यांनी म्हटलं आहे. एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमादरम्यान मनमोहन सिंह यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. दोन संस्थांमध्ये मतभेद असतात. पण, ते देखील आपल्याला स्वीकारता आले पाहिजेत असं देखील त्यांनी म्हटलं आहे. राजधानी दिल्लीमध्ये त्यांच्या चेंजिंग इंडिया या पुस्तकाचं प्रकाशन झालं. त्यावेळी त्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. यावेळी बोलताना मनमोहन सिंग यांनी आरबीआयची स्वायतत्ता मजबूत करण्याची गरज असून केंद्र सरकारसोबत मिळून काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, मागील महिनाभरामध्ये आरबीआय आणि केंद्र सरकारमधील वाद देखील चव्हाट्यावर आला. शिवाय, आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी देखील राजीनामा दिल्यानंतर मनमोहन सिंह यांच्या या वक्तव्याला खूप महत्त्व प्राप्त झालं आहे.

‘अनपेक्षितपणे पंतप्रधान, अर्थमंत्री’

यावेळी बोलताना मनमोहन सिंह यांनी आपण अँक्सिडेंटल पंतप्रधान नाही तर अर्थमंत्री देखील झालो असो असं म्हणत गतकाळातील आठवणींना उजाळा दिला. पी. व्ही. नरसिंहराव यांच्या काळात अर्थमंत्रीपदाची जबाबदारी येईल याचा केव्हा विचार नव्हता केला. पण, अनपेक्षितपणे ही जबाबदारी आली आणि ती मी स्वीकारली असं यावेळी मनमोहन सिंह यांनी बोलताना सांगितले.

- Advertisement -

यापूर्वी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यावर पुस्तक देखील आलं असून लवकरच चित्रपट देखील येणार आहे.

वाचा – मनमोहन सिंहही म्हणतात, ‘तर गव्हर्नरने राजीनामा द्यावा’

वाचा – मनमोहन सिंग मोदींवर नाराज, पत्र लिहून राष्ट्रपतींकडे तक्रार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -