घरताज्या घडामोडीहिंगोलीत धर्मांतरासाठी 'लिव्ह इन'मधील तरुणाची तरुणीला जीवे मारण्याची धमकी

हिंगोलीत धर्मांतरासाठी ‘लिव्ह इन’मधील तरुणाची तरुणीला जीवे मारण्याची धमकी

Subscribe

आफताब आणि श्रद्धाच्या 'लिव्ह इन' रिलेशनशिपमधील हत्याप्रकरणानंतर 'लिव्ह इन'मधील मुलींवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत असल्याची निदर्शनास येत आहे. अशातच हिंगोलीमध्ये 'लिव्ह इन'मध्ये राहणाऱ्या एका प्रियकराने त्याच्या प्रेयसीला धर्मांतर न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती समोर येत आहे.

आफताब आणि श्रद्धाच्या ‘लिव्ह इन’ रिलेशनशिपमधील हत्याप्रकरणानंतर ‘लिव्ह इन’मधील मुलींवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत असल्याची निदर्शनास येत आहे. अशातच हिंगोलीमध्ये ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या एका प्रियकराने त्याच्या प्रेयसीला धर्मांतर न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती समोर येत आहे. प्रियकराच्या धमकीनंतर प्रेयसीने याबाबत पोलीसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साजिद पठाण असे अटक करण्यात आलेल्या प्रियकराचे नाव आहे. साजिद आणि त्याची प्रेयसी हे दोघे हिंगोली जिल्ह्यातील डोंगरकडा येथे शपथपत्र तयार करून ‘लिव्ह इन’मध्ये राहत होते. (threatens young woman in hingoli convert religion or i will kill you young man in live in relationship)

- Advertisement -

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साजिद पठाण आणि पीडित तरुणी एकमेकांवर प्रेम करत होते. साजिदने तरुणीला दोन महिन्यापूर्वी पळून नेत तिच्यावर विविध ठिकाणी अत्याचार केले. तसेच तिच्याकडून लिव्ह इनमध्ये राहण्यासाठी जबरदस्तीने शपथपत्र लिहून घेतले.

प्रियकराच्या जबरदस्तीनंतर काही दिवस दोघेही ‘लिव्ह इन’मध्ये राहत होते. त्यानंतर प्रेयसीने साजिदकडे लग्नाची मागणी केली. परंतु, काही दिवस सोबत राहिलेल्या प्रेयसीला साजिद पठाणने तिला धर्मांतर करण्यास सांगितले. तसेच, धर्मांतरासाठी तो सातत्याने तिच्यावर दबावही टाकत होता. कालांतराने प्रेयसीने धर्मांतर करण्यास नकार दिला. प्रेयसीने धर्मांतरासाठी दिलेल्या नकारानंतर साजिदने प्रेयसीला धमकावण्यास सुरूवात केली.

- Advertisement -

प्रियकराचा सातत्याने होणारा त्रास सहन न झाल्यामुळे प्रेयसीने हिंगोलीतील बाळापूर पोलिस ठाण्यात साजिद विरोधात तक्रार दाखल केली. प्रेयसीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी साजिदला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.


हेही वाचा – मोदींना हात जोडून विनंती; राज्यपालांना महाराष्ट्राबाहेर काढा, संभाजीराजे छत्रपतींची संतप्त प्रतिक्रिया

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -