घरमहाराष्ट्रमुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर तीन अपघात

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर तीन अपघात

Subscribe

भरधाव वेगात स्विफ्ट पत्र्याच्या कठड्याला जाऊन जोरात धडकी चालक गंभीर जखमी

मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगतिमार्गावर झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात तिघे जण जखमी झाले आहेत. यात स्विफ्ट कारच्या भीषण अपघात चालक गंभीर जखमी झाला आहे. तर इतर दोघे जण किरकोळ जखमी झाले आहेत. स्विफ्ट कार रस्त्याच्या कडेला असणाऱ्या पत्र्याच्या कठड्याला जाऊन धडकली यात गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. मूनशिर आलम वय-३४ रा.अंधेरी मुंबई अस अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गहुंजे गावच्या हद्दीत झालेल्या अपघातात मुंबई-पुणे द्रुतमार्गावर स्विफ्ट गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला. यात चालक मूनशिर आलम हा गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्याच्या व्यक्तिरिक्त गाडीत कोणी नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. तो पुण्याच्या दिशेने जात असल्याची प्राथमिक माहिती आहे. तर इतर दोन अपघात कामशेत बोगद्याजवळ झाले, यात किलोमीटर क्रमांक ७० आणि ७२ येथे अपघात झाला. भरधाव वेगात असणाऱ्या इर्टीगा गाडीने समोरच्या वाहनाला धडक दिली यात किरकोळ नुकसान झाले असल्याने ते निघून गेले. तर तिसऱ्या अपघातात होंडा सिटी गाडीने अज्ञात वाहनाला धडक दिली यात दोघे जण किरकोळ जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -