घरमहाराष्ट्रदेहूरोड पोलिसांमुळे हरवलेल्या तीन वर्षीय 'वंश'ला मिळाली बहीण

देहूरोड पोलिसांमुळे हरवलेल्या तीन वर्षीय ‘वंश’ला मिळाली बहीण

Subscribe

देहूरोड पोलिसांच्या तत्परतेमुळे हरवलेला तीन वर्षीय चिमुकला अवघ्या दोन तासात कुटुंबात परतला आणि तो बहिणीच्या कुशीत विसावला.

देहूरोड पोलिसांच्या तत्परतेमुळे हरवलेला तीन वर्षीय चिमुकला अवघ्या दोन तासात कुटुंबात परतला आणि तो बहिणीच्या कुशीत विसावला. वंश विलास चव्हाण असं त्या तीन वर्षीय चिमुकल्याचे नाव आहे. तो मंगळवारी घरासमोर खेळताना अचानक रस्त्याकडे गेला आणि रस्ता विसरला. रावेत चौक येथे तो रडत थांबला होता. तेव्हा गस्त घालत असलेल्या पोलीस कर्मचारी यांनी वंशला पाहिले. त्यानंतर अवघ्या दोन तासात वंशला त्याच्या बहिणीकडे सुखरूप स्वाधीन केले.

सविस्तर माहिती अशी की, पोलीस कर्मचारी नवीन चव्हाण, गुजर, नंदनलाल राऊत, संजय आंधळे हे रावेत चौक येथे गस्त घालत होते. तेव्हा, रस्त्यावर तीन वर्षीय वंश हा रडत थांबला असल्याचे त्यांनी पाहिले. त्याच्याजवळ कोणी मोठे व्यक्ती दिसत नव्हते. अखेर तो हरवला असल्याचा संशय पोलिसांना आला, त्याच्याकडे अधिक माहिती विचारली परंतु त्याला काही बोलता येत नव्हते, केवळ तो त्याच नाव सांगत होता. संबंधित पोलीस कर्मचारी यांनी रावेत येथील परिसर वंशला घेऊन पिंजून काढला. तरीही वंशला त्याचे कुटुंब सापडले नव्हते.

- Advertisement -

दरम्यान, पोलीस कर्मचारी हे एका तीन वर्षीय मुलाला घेऊन त्याचे आई-वडील शोधत असल्याचे वंशच्या बहिणीला समजले. बहीण पूजा पवार हिने वेळ न दवडता रावेत चौकीला गेली. तिथे गेल्यानंतर आपला छोटा भाऊ वंश दिसताच त्यांना भरून आले. वंशच्या वडिलांचे निधन झाले आहे. तर आई रावेत परिसरात दुसऱ्या ठिकाणी राहते. वंश हा बहिणीकडे राहण्यास आला होता. घरासमोर खेळत असताना अचानक रस्त्यावर आला आणि घरी जाण्याचा रस्ता विसरला. मात्र ऐन वेळी वंश पोलिसांना दिसला आणि अवघ्या दोन तासातच वंश आपल्या बहिणीच्या कुशीत विसावला आहे. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन पवार पोलीस, संजय आंधळे, नवीन चव्हाण, गुजर, नंदलाल राऊत यांनी केली आहे.

हेही वाचा –

देहूरोड पोलिसांमुळे हरवलेल्या तीन वर्षीय ‘वंश’ला मिळाली बहीण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -