घरमहाराष्ट्रपुण्यात घडला 'मुळशी पॅटर्न' थरार; घटना सीसीटीव्हीत कैद

पुण्यात घडला ‘मुळशी पॅटर्न’ थरार; घटना सीसीटीव्हीत कैद

Subscribe

केवळ रागाने पाहिले म्हणून तरुणांचे टोळके एका तरुणाच्या मागे लागले. स्वत:चा जीव वाचवण्यासाठी हा तरुण एका दुकान लपून बसल्यामुळे त्याचा जीव वाचला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

सुसंस्कृत पुण्यामध्ये गेल्या काही महिन्यापासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. गेल्या २० दिवसांत पुण्याच्या विविध भागांमध्ये मिळून १२ जणांच्या हत्या झाल्या आहेत. अशाच पुण्याच्या स्वारगेट परिसरात सोमवारी रात्री ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटातील सिन सारखा प्रसंग घडला. केवळ रागाने पाहिले म्हणून तरुणांचे टोळके एका तरुणाच्या मागे लागले. स्वत:चा जीव वाचवण्यासाठी हा तरुण एका दुकान लपून बसल्यामुळे त्याचा जीव वाचला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

- Advertisement -

हातात कोयता घेऊन पाठलाग करणारा जमाव आणि जिवाच्या आकांताने पळणारा तरुण. एखाद्या चित्रपटात शोभेल असा हा प्रसंग आहे. पुण्याच्या स्वारगेट भागात सोमवारी संध्याकाळी ही घटना घडली आहे. मात्र पुणे सातारा रस्त्यावरील एका दुकानात शिरुन दुकानाचे शटर बंद केल्यामुळे तरुणाचा जीव वाचला आहे. हे दृश्य पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला.

सोमवारी संध्याकाळी तक्रारदार तरुण घरी जात होता. दरम्यान तरुणांचा गट आणि तरुणामध्ये भांडण झाले. एकमेकांकडे खुन्नसीने बघितल्यामुळे हे भांडण झाले. त्यानंतर तरुणांच्या गटाने हातात कोयता घेऊन तरुणाचा पाठलाग केला. स्वत:चा जीव वाचवण्यासाठी तरुण दुकानात लपल्यामुळे तो वाचला. याप्रकरणी त्याने पुण्याच्या दत्तवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहे. सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या आरोपींमध्ये तीन ते चार जण अल्पवयीन आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -